Sports

IND vs ENG T20 : सीरीजमध्ये इंग्लंडचं जोरदार कमबॅक; राजकोटमध्ये टीम इंडिया विजयाचा रथ रोखला

IND vs ENG T20 match update : टी२० सीरीजमध्ये इंग्लंडने जोरदार कमबॅक केलं आहे. टीम इंंग्लंडने राजकोटमध्ये टीम इंडिया विजयाचा रथ रोखला. टीम इंग्लंडच्या विजयाने सीरीजमधील त्यांचं आव्हान कायम राहणार आहे.

Vishal Gangurde

IND vs ENG 3rd Cricket match : भारतात सुरु असलेल्या टी२० सीरीजच्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाला दणका दिला आहे. या सीरीजच्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने भारताला धूळ चारली. इंग्लंडने टीम इंडियाला १४५ धावांवर रोखत सामना खिशात घातला. तिसऱ्या सामन्यातील विजयाने सीरीजमध्ये भारतासमोरील इंग्लंडचं आव्हान कायम असणार आहे.

इंग्लंडने भारताला टी-२० सीरीजच्या तिसरा सामन्यात गारद केले. इंग्लंडने मंगळवारी राजकोट मैदानात २६ धावांनी भारतावर मात केली. पाच सामनांच्या सीरीजमध्ये भारत २-१ ने पुढे आहे. भारताला राजकोटमध्ये १७२ धावांचं लक्ष्य मिळालं होतं. टीम इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा सामना करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. संजू सॅमसन तिसऱ्या षटकात बाद झाला. त्यानंतर भारताला एकापाठोपाठ धक्के बसत गेले.

हार्दिक पंड्याने भारतासाठी सर्वाधिक ४० धावा कुटल्या. त्याने ३५ चेंडूत एक चौकार आणि दोन षटकार लगावले. अभिषेक शर्माने २४, अक्षर पटेलने १५, कर्णधार सूर्यकुमार यादवने १४ धावा कुटल्या. इंग्लंडसाठी जेमी ओवरटनने तीन, ब्रायडन कार्से आणि जोफ्राने प्रत्येकी दोन-दोन गडी बाद केले.

गुजरातच्या राजकोटमधील निरंजन शाह मैदानात इंग्लंड आणि भारताचा संघ आमनेआमने आले. या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाला १७२ धावांचं आव्हान दिलं. इंग्लंडने २० षटकात ९ गडी गमावून १७१ धावा कुटल्या. इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा बेन डकेटने कुटल्या. त्याने ५१ धावा केल्या. लियाम लिविंगस्टोनने ४३ आणि जोस बटलरने २४ धावांचं योगदान दिलं. फिलिप साल्ट(५) आणि हॅरी ब्रूक (८) सहित इंग्लंडच्या सहा खेळाडूंनी दहाचाही आकडा पार केला नाही.

मार्क वुड आणि आदिल रशिदने प्रत्येकी १० धावा केल्या. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने पाच गडी बाद केले. त्याने ४ षटकांत २४ धावा देत ५ गडी बाद केले. हार्दिक पंड्याने २ तर रवी बिष्णोई आणि अक्षर पटेलने अनुक्रमे १-१ गडी बाद केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १ वर्षांहून अधिक वेळेनंतर कमबॅक करणाऱ्या मोहम्मद शमीला एकही विकेट मिळाला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

SCROLL FOR NEXT