IND vs ENG: वरुणचा 'पंच', राजकोटमध्ये ५ गडी बाद करताच रचला इतिहास

India vs England, Varun Chakravarthy: भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने तिसऱ्या टी-२० सामन्यात ५ गडी बाद केले. यासह त्याच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.
IND vs ENG: वरुणचा 'पंच', राजकोटमध्ये ५ गडी बाद करताच रचला इतिहास
varun chakravarthyTwitter
Published On

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी सुरुवातीला तुफान फटकेबाजी केली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कमबॅक केलं. भारताकडून गोलंदाजी करताना वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक ५ गडी बाद केले. यादरम्यान वरुण चक्रवर्तीच्या नावावर मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

IND vs ENG: वरुणचा 'पंच', राजकोटमध्ये ५ गडी बाद करताच रचला इतिहास
IND vs ENG: शमीला आज तरी संधी मिळणार का? तिसऱ्या सामन्यासाठी कशी असेल प्लेइंग ११? जाणून घ्या

वरुण चक्रवर्तीचं दमदार कमबॅक

वरुण चक्रवर्ती हा भारतीय संघातील मिस्ट्री गोलंदाज आहे. जेव्हापासून त्याने कमबॅक केलंय, तेव्हापासून तो भारतीय संघासाठी संकटमोचक ठरतोय. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात त्याने ४ षटकात ६ च्या इकोनॉमिने २४ धावा खर्च करत ५ गडी बाद केले.

जेव्हापासून त्याने भारतीय संघात कमबॅक केलंय तेव्हापासून त्याने १० टी-२० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १०.९६ च्या सरासरीने २७ गडी बाद केले आहेत. यादरम्यान त्याने २ वेळेस ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. ही आकडेवारी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक केल्यानंतरची आहे

IND vs ENG: वरुणचा 'पंच', राजकोटमध्ये ५ गडी बाद करताच रचला इतिहास
IND vs ENG: पुणेकरांचा नाद नाय ! भारत- इंग्लंड सामन्याची तिकिटं अवघ्या काही मिनिटात सोल्ड आऊट

वरुणच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

युझवेंद्र चहल विरुद्ध इंग्लंड - ६-२५ (२०१७)

कुलदीप यादव विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५-१७ (२०२३)

वरुण चक्रवर्ती विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५-१७ (२०२४)

कुलदीप यादव विरुद्ध इंग्लंड - ५-२४ (२०१८)

वरुण चक्रवर्ती विरुद्ध इंग्लंड - ५-२४ (२०२५)

IND vs ENG: वरुणचा 'पंच', राजकोटमध्ये ५ गडी बाद करताच रचला इतिहास
IND vs ENG 3rd T20I: १४ महिन्यांनंतर शमीचं कमबॅक! स्टार खेळाडूला बसवलं; पाहा टीम इंडियाची प्लेइंग ११

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक फायफर घेणारे भारतीय गोलंदाज

२ - वरुण चक्रवर्ती विरुद्ध दक्षिण आफ्रिका, इंग्लंड

२ - कुलदीप यादव विरुद्ध दक्षिण आफ्रिका, इंग्लंड

२ - भुवनेश्‍वर कुमार विरुद्ध दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान

१ - युजवेंद्र चहल विरुद्ध इंग्लंड

१- दीपक चाहर विरुद्ध बांग्‍लादेश

टी-२० क्रिकेटमधील सलग १० डावात सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज

२७ गडी: वरुण चक्रवर्ती

२६ गडी: अजंता मेंडिस

२५ गडी: कुलदीप यादव

द्विपक्षीय टी-२० मालिकांमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज

वरुण चक्रवर्ती -१२ विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २०२४

वरुण चक्रवर्ती - १० विरुद्ध इंग्लंड, २०२५ (होम)

आर अश्विन - ९ विरुद्ध श्रीलंका, २०१६ (होम)

रवि बिश्नोई - ९ विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २०२३ (होम)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com