IND vs ENG 3rd T20I: १४ महिन्यांनंतर शमीचं कमबॅक! स्टार खेळाडूला बसवलं;  पाहा टीम इंडियाची प्लेइंग ११
mohamme shamitwitter

IND vs ENG 3rd T20I: १४ महिन्यांनंतर शमीचं कमबॅक! स्टार खेळाडूला बसवलं; पाहा टीम इंडियाची प्लेइंग ११

Mohammed Shami Comeback, IND vs ENG 3rd T2OI: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या सामन्यात शमीला कमबॅक करण्याची संधी मिळाली आहे.
Published on

भारत आणि इंग्लंड या दोन्ही सामन्यांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. भारतीय संघ या मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा सामना राजकोटच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यातही भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान भारतीय संघातील प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.

IND vs ENG 3rd T20I: १४ महिन्यांनंतर शमीचं कमबॅक! स्टार खेळाडूला बसवलं;  पाहा टीम इंडियाची प्लेइंग ११
IND vs ENG: शमीला आज तरी संधी मिळणार का? तिसऱ्या सामन्यासाठी कशी असेल प्लेइंग ११? जाणून घ्या

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी १४ महिने संघाबाहेर राहिल्यानंतर, इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. मात्र सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याला भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आलं नव्हतं.

आता तिसऱ्या टी-२० सामन्यात अर्शदीप सिंगला विश्रांती देण्यात आली आहे. तर त्याच्या जागी मोहम्मद शमीला कमबॅक करण्याची संधी देण्यात आली आहे. उर्वरीत संघ दुसऱ्या सामन्यात होता तसाच आहे. शमी १९ नोव्हेंबरनंतर पहिल्यांदाच मैदानावर उतरणार आहे.

IND vs ENG 3rd T20I: १४ महिन्यांनंतर शमीचं कमबॅक! स्टार खेळाडूला बसवलं;  पाहा टीम इंडियाची प्लेइंग ११
IND vs ENG: इंग्लंडसाठी 'करो यो मरो', एक दिवसाआधीच जाहीर केली तगडी प्लेइंग ११; कोणाला मिळालं स्थान?

भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये केवळ १ बदल करण्यात आला आहे. तर इंग्लंडने सामन्याच्या १ दिवसाआधीच प्लेइंग ११ ची घोषणा केली होती. हा सामना इंग्लंडसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण भारतीय संघाने ५ पैकी सुरुवातीचे २ सामने जिंकले आहेत. हा सामना जिंकून भारतीय संघ ३-० ने विजयी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर इंग्लंडचा संघ हा सामना जिंकून २-१ ने कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. आता कोणता संघ जिंकणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

इंग्लंड - फिलिप सॉल्ट, बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), जेमी ओव्हर्टन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड.

भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), ध्रुव जुरेल, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com