IND vs ENG: RCB च्या फॅन्सचं टेन्शन वाढलं! ११.५० कोटी रुपयात घेतलेला फलंदाज ठरतोय सुपरफ्लॉप

Phil Salt Flopshow In IND vs ENG T20I Series: इंग्लंडचा आक्रमक फलंदाज फिल सॉल्ट भारतीय संघाविरुद्ध सुरु असलेल्या टी-२० मालिकेत पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे.
IND vs ENG: RCB च्या फॅन्सचं टेन्शन वाढलं!  ११.५० कोटी रुपयात घेतलेला फलंदाज ठरतोय सुपरफ्लॉप
rcbtwitter
Published On

आयपीएल २०२५ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये या स्पर्धेसाठीचा मेगा लिलाव पार पडला होता. या लिलावात अनेक स्टार खेळाडूंवर मोठी बोली लागली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनेही खेळाडूंवर पाण्यासारखा पैसा ओतला. इंग्लंडचा आक्रमक फलंदाज फिल सॉल्टला संघात घेण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पूर्ण जोर लावला. अखेर ११.५० कोटी मोजत बंगळुरुने त्याला आपल्या संघात स्थान दिलं. दरम्यान आरसीबीच्या फॅन्सचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.

IND vs ENG: RCB च्या फॅन्सचं टेन्शन वाढलं!  ११.५० कोटी रुपयात घेतलेला फलंदाज ठरतोय सुपरफ्लॉप
IND vs ENG: शमीला आज तरी संधी मिळणार का? तिसऱ्या सामन्यासाठी कशी असेल प्लेइंग ११? जाणून घ्या

आरसीबीचे ११.५० कोटी पाण्यात?

इंग्लंडचा आक्रमक फलंदाज फिल सॉल्ट आयपीएल २०२४ स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना दिसून आला होता. या संघाकडून खेळताना त्याने १८२ च्या स्ट्राईक रेटने ४३५ धावा चोपल्या होत्या. त्याची ही कामगिरी पाहता, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने त्याला आपल्या संघात स्थान दिलं. मात्र भारतीय संघाविरुद्ध सुरु असलेल्या टी-२० मालिकेत त्याची बॅट शांतच राहिली आहे.

IND vs ENG: RCB च्या फॅन्सचं टेन्शन वाढलं!  ११.५० कोटी रुपयात घेतलेला फलंदाज ठरतोय सुपरफ्लॉप
IND vs ENG: पुणेकरांचा नाद नाय ! भारत- इंग्लंड सामन्याची तिकिटं अवघ्या काही मिनिटात सोल्ड आऊट

भारतीय संघाविरुद्ध खेळताना ठरतोय फ्लॉप

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये सॉल्टला सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली. मात्र तिन्ही सामन्यांमध्ये तो स्वस्तात माघारी परतला आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात अर्शदीप सिंगने त्याला शून्यावर माघारी धाडलं होतं.

त्यानंतर दुसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा अर्शदीप सिंगने त्याला ४ धावांवर बाद करत माघारी धाडलं. तर मालिकेतील तिसरा सामना राजकोटच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात अर्शदीप सिंगच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्याने त्याला ५ धावांवर बाद करत माघारी धाडलं.

मालिकेतील ३ सामन्यांमध्ये फिल सॉल्टला अवघ्या ९ धावा करता आल्या आहेत. ही आरसीबीच्या फॅन्ससाठी टेन्शन वाढवाणारी बातमी आहे. कारण सॉल्ट आरसीबीकडून सलामीला फलंदाजीला येऊ शकतो. त्याची ही फलंदाजी पाहता आरसीबीचे ११.५० कोटी पाण्यात जाण्याची भिती वर्तविली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com