ENGLAND playing 11 twitter/ECB
Sports

IND vs ENG, England Playing XI: भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग ११ जाहीर! घातक गोलंदाजाचं कमबॅक

England Playing XI For IND vs ENG 4th Test: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये २३ फेब्रुवारीपासून चौथ्या कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडच्या प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे

Ankush Dhavre

IND vs ENG 4th Test, England Playing XI:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये २३ फेब्रुवारीपासून चौथ्या कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. रांचीच्या मैदानावर होणाऱ्या या सामन्यासाठी इंग्लंडने प्लेइंग ११ ची घोषणा केली आहे. या सामन्यासाठी इंग्लंडच्या प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. या संघातून वेगवान गोलंदाज मार्क वुड आणि रेहान अहमदला वगळण्यात आलं आहे. तर ओली रॉबिन्सन आणि शोएब बशीरला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आलं आहे.

हा सामना रांचीतील JSCA आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने आपलं फिरकीतील मुख्य अस्त्र बाहेर काढलं आहे. त्यांनी या संघात शोएब बशीरला स्थान दिलं आहे. मालिकेत पिछाडीवर असलेल्या इंग्लंडला मालिकेत बरोबरी करुन देण्याची जबाबदारी शोएब बशीरवर असणार आहे. कारण रांचीची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल असते.

तिसऱ्या सामन्यानंतर असं म्हटलं जात होतं की, चौथ्या कसोटीतून जॉनी बेअरस्टोला विश्रांती दिली जाईल. मात्र टीम मॅनेजमेंटने त्याला आणखी एक संधी दिली आहे. तसेच वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन देखील चौथा कसोटी सामना खेळताना दिसून येणार आहे. (Cricket news marathi)

या सामन्यातही झॅक क्रॉली आणि बेन डकेट डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतात. तर ओली पोप तिसऱ्या क्रमांकावर आणि जो रुट चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसून येईल. फॉर्ममध्ये परतण्याच्या प्रयत्नात असलेला जॉनी बेअरस्टो या सामन्यातही पाचव्या क्रमांकावर खेळताना दिसून येईल.

या सामन्यासाठी अशी आहे इंग्लंडची प्लेइंग ११ (England Playing XI) :

झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पॉप, जो रुट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, टॉम हर्टली, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन, शोएब बशीर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT