मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या एलिमिनेटरमध्ये राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु पराभव केला. त्यानंतर दिनेश कार्तिकने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली. राजस्थानच्या विजयानंतर दिनेश कार्तिकने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये शेवटचा सामना खेळत निवृत्तीची मोठी घोषणा केली. विराट कोहलीसहित अनेक खेळाडूंनी त्याला भावुक होत निरोप दिला.
दिनेश कार्तिकने १६ वर्षांच्या कारकिर्दीत ६ संघाचं प्रतिनिधित्व केलं. मुंबई इंडियन्ससोबत खेळताना एक पुरस्कार जिंकण्याचाही विक्रम केला. कोलकाता नाइट रायडर्स संघाचंही दोन वर्ष नेतृत्व केलं. त्याने एकदा संघाला प्लेऑफमध्ये देखील पोहोचवलं.
दिनेश कार्तिकचं आयपीएल करिअरला सुरुवात दिल्ली डेयरडेविल्स संघासोबत सुरुवात केली. दिनेशने आरसीबीसाठी शेवटचा सामना खेळला.
गेल्या काही दिवसांपासून दिनेश कार्तिकच्या निवृत्तीची चर्चा क्रिकेटप्रेमीमध्ये सुरु होती. त्यानंतर जियो सिनेमाने एक्सवर पोस्ट शेअर करत दिनेश कार्तिकच्या आयपीएलमधून निवृत्तीच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यानंतर इंडियन प्रीमियर लीगनेही अधिकृत एक्सवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. मात्र, याबाबत दिनेश कार्तिककडून कोणतंही विधान आलेलं नाही.
दरम्यान, दिनेश कार्तिक २००८ पासून आयपीएलच्या प्रत्येक हंगामात खेळताना दिसला आहे. दिनेश कार्तिकने १७ हंगामामध्ये फक्त दोन सामन्यात दिसला नव्हता. कार्तिकने आयपीएल कारकिर्दीत एकूण २५७ सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या बरोबरीने कार्तिकने सामने खेळले आहेत. तर धोनीने २६४ आयपीएल सामने खेळले आहेत. दिनेश कार्तिक हा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा १० वा खेळाडू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.