Virat Kohli Record: विराटच्या रडारवर IPL स्पर्धेतील सर्वात मोठा रेकॉर्ड! असा कारनामा करणारा ठरणार पहिलाच फलंदाज

RR vs RCB, IPL 2024: आज होणाऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. दरम्यान या सामन्यात विराटला मोठा रेकॉर्ड करण्याची संधी असणार आहे.
Virat Kohli Record: विराटच्या रडारवर IPL स्पर्धेतील सर्वात मोठा रेकॉर्ड! असा कारनामा करणारा ठरणार पहिलाच फलंदाज
Virat kohli record
Published On

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला प्लेऑफमध्ये पोहचवण्यात विराट कोहलीने मोलाची भूमिका बजावली आहे. या हंगामात त्याची बॅट चांगलीच तळपली आहे. ऑरेंज कॅपच्या यादीत तो अव्वल स्थानी असून, इतर फलंदाज त्याच्या आसपासही नाहीत. दरम्यान राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यातही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. या सामन्यात त्याला इतिहास रचण्याची संधी असणार आहे.

विराट कोहली आयपीएलमध्ये रचणार इतिहास

गुणतालिकेत सर्वात शेवटी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने दमदार कमबॅक केलं आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाला पराभूत करत प्लेऑफमध्ये धडक दिली. एलिमिनेटरच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ राजस्थान रॉयल्स संघासोबत दोन हात करताना दिसून येणार आहे. दरम्यान या सामन्यात २९ धावा करताच त्याच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद होणार आहे. तो आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात ८००० धावा करणारा पहिलाच फलंदाज ठरणार आहे.

Virat Kohli Record: विराटच्या रडारवर IPL स्पर्धेतील सर्वात मोठा रेकॉर्ड! असा कारनामा करणारा ठरणार पहिलाच फलंदाज
RR vs RCB,Playing XI: RCB चं टेन्शन वाढणार! महत्वाच्या सामन्यात RR च्या ताफ्यात विस्फोटक फलंदाजाची एन्ट्री

विराट कोहलीच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने २५१ डावात ७९७१ धावा केल्या आहेत. यादरम्यान ११३ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिली आहे. इतर कुठलाही फलंदाज विराट कोहलीच्या रेकॉर्डच्या आसपासही नाही. या यादीत शिखर धवन दुसऱ्या स्थानी आहे. त्याने आतापर्यंत ६७६९ धावा केल्या आहेत.

Virat Kohli Record: विराटच्या रडारवर IPL स्पर्धेतील सर्वात मोठा रेकॉर्ड! असा कारनामा करणारा ठरणार पहिलाच फलंदाज
Pat Cummins Viral Video: पॅट कमिन्सने घेतला शाळकरी मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद;Video व्हायरल

यासह विराट कोहलीला आणखी एक मोठा रेकॉर्ड मोडण्याची संधी असणार आहे. विराट कोहलीने या हंगामात आतापर्यंतत ७०८ धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात जर त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने विजय मिळवला. तर इथून पुढे विराटला आणखी २ सामने खेळण्याची संधी मिळू शकते. या सामन्यांमध्ये जर त्याने २६६ धावा केल्या, तर तो आपलाच रेकॉर्ड मोडून काढू शकतो. विराटने २०१६ मध्ये झालेल्या हंगामात ९७३ धावा केल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com