DC VS MI Highlights Tilak Varma x
Sports

DC VS MI Highlights : रोहित-हार्दिक फेल, मिडल ऑर्डरने सावरला खेळ, तिलक-रायनची धमाकेदार खेळी

DC VS MI Match : अरुण जेटली स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० ओव्हर्समध्ये २०० धावा पार केल्या आहेत.

Yash Shirke

DC VS MI IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना सुरु आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबईच्या संघाने २० ओव्हर्समध्ये २०५ धावा केल्या. आता आजचा सामना जिंकण्यासाठी दिल्लीच्या संघाला २०६ धावा कराव्या लागणार आहेत.

मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीची चांगली सुरुवात झाली पण सलामीवीर रोहित शर्मा लवकर आउट झाला. रियान रिकल्टनने ४१ धावा, सूर्यकुमार यादवने ४० धावा केल्या. तिलक वर्माने आक्रमक खेळत ५६ धावा केल्या. शेवटच्या ओव्हर्समध्ये आलेल्या नमन धीरने १७ बॉल्समध्ये ३८ धावा केल्या. हार्दिक पंड्या २ धावा करुन तंबूत परतला.

दुसऱ्या बाजूला दिल्लीकडून खेळताना कुलदीप यादवने दमदार गोलंदाजी केली. त्याने रायन रिकल्टन आणि सूर्यकुमार यादव यांना त्याने बाद केले. ४ ओव्हर्समध्ये फक्त २३ धावा दिल्या. यादवप्रमाणे विपराज निगमनेदेखील दोन विकेट्स घेतल्या. तर मुकेश कुमारने एक विकेट घेतली. अन्य गोलंदाजांना विकेट घेण्यात यश मिळाले नाही.

मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११ -

हार्दिक पंड्या (कर्णधार) रोहित शर्मा, रायन रिकल्टन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह

दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग ११ -

अक्षर पटेल (कर्णधार), जेक फ्रेजर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल, केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, कुलदीप यादव, मुकेश कुमार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT