मुंबईमधील हायप्रोफाईल भागातील इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची पळापळ

Building Fire in Juhu: मुंबईतील जुहू तारा रोड परिसरातील सुजाता इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे इमारतीतील रहिवाशांमध्ये घबराट पसरलीय.
Building Fire in Juhu:
IMD Weather Alert: Heavy Rain And 70 Kmph Winds Forecast For 13 Statessaam tv
Published On: 
Summary
  • जुहू तारा रोड परिसरातील सुजाता इमारतीला आग

  • आगीमुळे इमारतीतील रहिवाशांमध्ये घबराट पसरली

  • बाहेर पडण्याच्या मार्गावर अतिक्रमण असल्यामुळे अडचणी आल्याचा आरोप

संजय गडदे, साम प्रतिनिधी

जुहू तारा रोड परिसरातील सुजाता इमारतीला भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीमुळे इमारतीतील रहिवाशांमध्ये घबराट पसरली. जीव वाचवण्यासाठी रहिवाशांनी इमारतीबाहेर धाव घेतली. मात्र, इमारतीच्या बाहेर पडण्याच्या मार्गावर अतिक्रमण असल्यामुळे नागरिकांना बाहेर पडताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. या अतिक्रमणामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनाही इमारतीत प्रवेश करताना अडथळे आल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

Building Fire in Juhu:
Maharashtra News Live Update: पुण्यातील नवले पुलावरील सेल्फी पॉईंटजवळ चारचाकी वाहनाला लागली आग

मिळालेल्या माहितीनुसार, सुजाता इमारतीच्या आतील भागात मोठ्या प्रमाणात आग लागली होती. आग लागल्याचे लक्षात येताच रहिवाशांमध्ये घबराट पसरली आणि अनेकांनी जीवाच्या आकांताने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले.

मात्र, इमारतीच्या एक्झिट गेटवर अतिक्रमण असल्यामुळे रहिवाशांना बाहेर पडताना अडचणी आल्याचा आरोप स्थानिकांनी केला. हे अतिक्रमण फॅशन डिझायनर इशिका अग्रवाल यांच्या माध्यमातून करण्यात आल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे. तसेच, इमारतीच्या आत अग्निशमन दलाच्या गाड्या आणि जवानांना पोहोचण्यासाठी पुरेसा मोकळा मार्ग नसल्याने आग विझवण्याच्या कामात अडथळे निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

अतिक्रमणावर कारवाईची मागणी

इमारतीच्या बाहेर पडण्याच्या मार्गावर अतिक्रमण असल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता स्थानिकांनी व्यक्त केली. अतिक्रमण हटवून मार्ग मोकळा करावा, अशी मागणी रहिवाशांनी केली. मात्र, याबाबत पोलिसांकडे विचारणा केली असता, ‘हे आमचे काम नाही,’ असे पोलिसांनी सांगितल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे. या आरोपांबाबत संबंधितांची अधिकृत बाजू अद्याप स्पष्ट झालेली नाही.

Building Fire in Juhu:
Water Cut Alert : कल्याण-डोंबिवलीकरांनो पाणी जपून वापरा! मंगळवारी नळाला थेंबही पाणी येणार नाही; 'या' भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, इमारतीच्या बाहेर पडण्याच्या मार्गावरील अतिक्रमण आणि अग्निशमन दलाला प्रवेश करताना आलेल्या अडचणींमुळे आपत्कालीन परिस्थितीत इमारतीतील रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी करून अतिक्रमणावर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com