सूरज मसुरकर, साम टीव्ही
मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या BEST बसमधून प्रवास करताना आता कोळी महिलांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे. माशांचा वास येतो, त्यामुळे इतर प्रवाशांना त्रास होईल, असं कारण देत वातानुकूलित बसमध्ये कोळी महिलांना प्रवेश नाकारला जात असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुंबईच्या मूळ रहिवासी असलेल्या कोळी महिलांना अशा प्रकारे बसमध्ये प्रवेश नाकारला जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी ठाकरे गटाचे नगरसेवक चिंतामणी निवाटे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
मुंबईत जुन्या साध्या बसच्या जागी नव्या वातानुकूलित इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. मात्र, या बसमधून प्रवास करणाऱ्या मच्छीविक्रेत्या कोळी महिलांना भेदभावाचा सामना करावा लागत आहे. या महिला पहाटे चार वाजल्यापासून दक्षिण मुंबईतील ससून डॉक आणि भाऊचा धक्का येथून मासे घेऊन उपनगरांमध्ये विक्रीसाठी जातात.
मात्र, मासे घेऊन AC बसमध्ये चढताना माशांचा वास येत असल्याचं कारण देत चालकांकडून प्रवेश नाकारला जात असल्याचा आरोप आहे. इतर प्रवाशांना वासाचा त्रास होईल, असं सांगून काही चालक थेट बसचे दरवाजे बंद करत असल्याचंही सांगण्यात येत आहे.
एकीकडे मुंबईच्या अर्थव्यवस्थेत आणि पारंपरिक मासेमारी व्यवसायात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कोळी महिलांना सार्वजनिक वाहतूक सेवेत असा अनुभव येत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे कोळी महिलांच्या प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.