Tiger Shroff: टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर ६ दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

Tiger Shroff’s Sale Appartmnet After Firing : अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर अभिनेत्यानं मोठा निर्णय घेतलाय. घटनेच्या सहा दिवसांनी त्याने मुंबईतील खार परिसरातील आपला फ्लॅट विकलाय.
Tiger Shroff sells luxury apartment in Khar West Mumbai for ₹9 crore
Tiger Shroff sells luxury apartment in Khar West Mumbai for ₹9 croresaam tv
Published On: 
Summary
  • अभिनेता टायगर श्रॉफने मुंबईतील आलिशान अपार्टमेंट विकलाय.

  • खार वेस्ट परिसरात होता हा फ्लॅट

  • फ्लॅट विक्रीच्या व्यवहाराची नोंदणी २२ ऑक्टोबर रोजी झालीय.

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. जुहूमध्ये घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे चर्चेत असलेल्या टायगर श्रॉफनं एक मोठा निर्णय घेतलाय. गोळीबाराच्या ६ दिवसानंतर टायगर श्रॉफनं मुंबईतील खार वेस्ट भागातील आलिशान फ्लॅट विकलाय. सुमारे ९ कोटी रुपयांना त्याने त्याचा फ्लॅट विकलाय. या मालमत्तेच्या विक्रीची नोंदणी २२ ऑक्टोबर रोजी झालीय. म्हणजेच जुहू परिसरात त्याच्या कारवर गोळीबार झाल्याच्या घटनेच्या अवघ्या चार दिवसांनंतर मात्र हा फ्लॅट विकण्याचा निर्णय गोळीबाराच्या घटनेशी संबंधित होता का याबाबत अजून कोणतीच माहिती मिळाली नाहीये.

Tiger Shroff sells luxury apartment in Khar West Mumbai for ₹9 crore
मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

मिळालेल्या माहितीनुसार, टायगर श्रॉफने जुलै २०१८ मध्ये हा फ्लॅट ७.६१ कोटी रुपयांना खरेदी केला होता. आता त्याने तो ९ कोटी रुपयांना विकलाय. खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांच्यात सुमारे १.३९ कोटी रुपयांचा फरक आहे. सुमारे आठ वर्षांच्या कालावधीत या मालमत्तेचे मूल्य सुमारे १८.३ टक्क्यांनी वाढलंय.

नवव्या मजल्यावरील आलिशान अपार्टमेंट

टायगर श्रॉफच्या मालकीचे हे अपार्टमेंट मुंबईतील खार वेस्ट येथील मेन ॲव्हेन्यू रोडवरील एका निवासी इमारतीच्या नवव्या मजल्यावर होते. या मालमत्तेचे कार्पेट क्षेत्रफळ १,२९१.१४ चौरस फूट असल्याचे सांगण्यात आले आहे. यासह यात ९५.८० चौरस फूट क्षेत्राची एक स्वतंत्र जागाही समाविष्ट होती.

या मालमत्तेमध्ये दोन कव्हर केलेल्या कार पार्किंग जागांचाही समावेश होता. 'द इकॉनॉमिक टाइम्स'च्या अहवालानुसार, खरेदीदाराने या व्यवहारावर सुमारे ५४ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) भरले आहे. मालमत्तेबाबतचा हा तपशील रिअल इस्टेट डेटा ॲनालिटिक्स प्लॅटफॉर्म 'सीआरई मॅट्रिक्स' (CRE Matrix) द्वारे मिळवलेल्या नोंदणी दस्तऐवजांमधून प्राप्त झालाय.

Tiger Shroff sells luxury apartment in Khar West Mumbai for ₹9 crore
Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

मिळालेल्या माहितीनुसार टायगर श्रॉफने जुलै २०१८ मध्ये थेट प्रकल्पाच्या विकासकाकडून (डेव्हलपरकडून) हा फ्लॅट खरेदी केला होता. नोव्हेंबर २०१९ मध्ये त्याला या मालमत्तेचा ताबा मिळाला. आता सुमारे आठ वर्षांनंतर, ही मालमत्ता ९ कोटी रुपयांना विकली गेलीय. टायगरनं ७.६१ कोटी रुपयांमध्ये अपार्टमेंट खरेदी केला होता. तर त्याची विक्रीही ९ कोटी रुपयांवर केलीय. टायगर श्रॉफ यांना सुमारे १.३९ कोटी रुपयांचा फायदा झालाय.

मात्र, प्रत्यक्ष नफा किती झाला हे जाणून घेण्यासाठी मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी), नोंदणी शुल्क, देखभाल खर्च आणि इतर बाबींवर झालेला खर्चही विचारात घेणे आवश्यक आहे. आता टायगर श्रॉफच्या एका मालमत्ता व्यवहाराची माहिती समोर आली आहे. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी, त्याच्या कारवर तीन व्यक्तींनी गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी पाच ते सहा राऊंड गोळीबार केला आणि त्यानंतर ते मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पळून गेले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com