lsg vs dc twitter
Sports

DC vs LSG, IPL 2025: केएल राहुलशिवाय दिल्लीचा संघ मैदानात; प्रथम गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग ११

DC vs LSG, IPL 2025 Toss Update: आयपीएल २०२५ स्पर्धेतील तिसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे.

Ankush Dhavre

विशाखापट्टनमच्या मैदानावर आयपीएल २०२५ स्पर्धेतील तिसऱ्या सामन्याचा थरार सुरु आहे. हा सामना लखनऊ सुपरजायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी कशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११? जाणून घ्या.

लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हेड टू हेड रेकॉर्ड?

लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ आतापर्यंत ५ वेळेस आमनेसामने आले आहेत. या ५ पैकी ३ सामन्यांमध्ये लखनऊ सुपरजायंट्सने बाजी मारली आहे. तर दिल्लीचा रेकॉर्ड पाहिला, तर दिल्लीने आतापर्यंत २ वेळेस बाजी मारली आहे. गेल्या हंगामात हे दोन्ही संघ २ वेळेस आमनेसामने आले होते. या दोन्ही सामन्यांमध्ये दिल्लीने बाजी मारली आहे. त्यामुळे कुठेतरी दिल्लीचं पारडं जड असणार आहे.

केएल राहुल बाहेर

या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख फलंदाज केएल राहुल पहिल्या सामन्यातून बाहेर पडला आहे. केएल राहुल ३ दिवसांपूर्वी विशाखापट्टनमध्ये आला होता. मात्र सामन्याच्या १ दिवसापूर्वी तो मुंबईत परतला आहे. त्याची पत्नी आपल्या पहिल्या मुलाला जन्म देणार आहे. या खास क्षणासाठी त्याने टीम मॅनेजमेंटला विनंती केली होती. ही विनंती टीम मॅनेजमेंटने मान्य केली.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

लखनऊ सुपर जायंट्स (Playing XI): एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बडोनी, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), डेविड मिलर, प्रिन्स यादव, दिग्वेश राठी, शहबाज अहमद, शार्दुल ठाकुर, रवी बिश्नोई.

दिल्ली कॅपिटल्स (Playing XI): जेक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डु प्लेसिस, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), समीर रिजवी, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT