DC vs LSG, IPL 2025: रिषभ लखनऊ, तर राहुल दिल्लीकडून पहिल्यांदाच उतरणार मैदानात; कशी असेल दोन्ही संघांची Playing XI?

DC vs LSG Playing XI Prediction: आयपीएल २०२५ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.
lsg vs dc
lsg vs dcsaam tv
Published On

DC vs LSG Playing XI Prediction: आयपीएल २०२५ स्पर्धेत आतापर्यंत ३ सामने खेळले गेले आहेत. हे तिन्ही सामने रोमांचक झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. आज या स्पर्धेतील चौथा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.

हा सामना खास असण्यामागचं कारण म्हणजे, या दोन्ही संघातील प्रमुख खेळाडू आपल्या जुन्या फ्रँचायझीविरुद्ध पहिल्यांदाच खेळण्यासाठी आमनेसामने येणार आहेत. दिल्लीचा माजी कर्णधार लखनऊ सुपरजायंट्सचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. तर लखनऊचा माजी कर्णधार या सामन्यात दिल्लीकडून खेळताना दिसून येणार आहे.

lsg vs dc
IPL 2025: दुष्काळात तेरावा महिना! आधी पाठीचं दुखणं आणि त्यात रूममध्ये घडली विचित्र घटना; 'या' खेळाडूवर आयपीएलमधून बाहेर होण्याची टांगती तलवार

राहुल दिल्लीकडून, तर रिषभ लखनऊकडून खेळणार

गेल्या हंगामात रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्स संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. या हंगामानंतर रिषभने दिल्ली कॅपिटल्सचा साथ सोडण्याचा निर्णय घेतला होता. तो लिलावात आला आणि लखनऊने त्याच्यावर रेकॉर्डब्रेकिंग २७ कोटींची बोली लावली. यापू्र्वी इतकी बोली कुठल्याही खेळाडूवर लागली नव्हती.

lsg vs dc
CSK vs MI Live Score, IPL 2025: चेन्नईच्या फिरकीत अडकली मुंबई; CSK ठरली 'किंग्स'!

तर दुसरीकडे केएल राहुल लखनऊचा कर्णधार होता. गेल्या हंगामात केएल राहुल आणि संघमालक गोयंका यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर केएल राहुल लखनऊची साथ सोडणार अशी चर्चा रंगली होती.

तरीही गोयंकांनी त्याला थांबण्यास सांगितलं होतं. मात्र राहुलने थांबण्यास नकार दिला होता. तो लिलावात आला आणि त्याला दिल्लीने आपल्या ताफ्यात स्थान दिलं. त्याला या संघाकडून कर्णधारपदाची ऑफर होती, मात्र त्याने ही ऑफर फेटाळून लावली.

lsg vs dc
IPL 2025 : आर्चरला हैदराबादनं टॉर्चर केलं! चार ओव्हरमध्ये तब्बल 'इतक्या' धावांनी चोपलं, चौकार, षटकारांनी धू धू धुतलं..

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११:

दिल्ली कॅपिटल्सची संभावित प्लेइंग ११: जेक फ्रेजर-मॅकगर्क, फाफ डु प्लेसिस, अभिषेक पोरेल, केएल राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मुकेश कुमार, टी नटराजन (इम्पॅक्ट प्लेअर: करुण नायर/मोहित शर्मा)

लखनऊ सुपर जायंट्स संघाची संभावित प्लेइंग ११: अर्शिन कुलकर्णी, मिचेल मार्श, रिषभ पंत (कर्णधार,यष्टीरक्षक), निकोलस पूरन, आयुष बदोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकुर, राजवर्धन हंगरगेकर, रवि बिश्नोई, शमार जोसेफ (इम्पॅक्ट प्लेअर: आकाश सिंग/शाहबाज अहमद/मणिमारन सिद्दार्थ).

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com