CSK vs MI Live Score, IPL 2025: चेन्नईच्या फिरकीत अडकली मुंबई; CSK ठरली 'किंग्स'!

CSK vs MI Chennai Super Kings Won Match: आयपीएलमधील सर्वोत बलाढ्य समजली जाणारी दोन्ही संघ आमनेसामने आली. दोन्ही संघाचा पहिला सामना होता, या सामन्यात मुंबईचा पराभव झाला.
CSK vs MI Live Score, IPL 2025: चेन्नईच्या फिरकीत अडकली मुंबई; CSK ठरली 'किंग्स'!
Published On

सीएसकेचा फलंदाज रचिन रवींद्रने लढाऊ खेळी खेळत मुंबई इंडियन्सला मात दिली. घरच्या मैदानात चेन्नईने मुंबईच्या संघाला पाणी पाजलं. मुंबई इंडियन्सच्या संघाने दिलेलं १५६ धावांचं आव्हान अखेरच्या षटकात चेन्नईने पार केलं.

चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2025 ची सुरुवात विजयाने केली. चेपॉकमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध शानदार विजय मिळवला. चेन्नईच्या संघाने मोसमातील पहिल्याच सामन्यात आपले वर्चस्व दाखवलं. सीएसकेने आधी गोलंदाजी आणि नंतर शानदार फलंदाजीने मुंबई संघाचा दारूण पराभव केला. CSK कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर चेन्नईच्या गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदांजी करत एमआयला केवळ 155 धावांवर रोखले. तर चेन्नई संघाने हे लक्ष्य ५ चेंडू बाकी असताना सहज गाठले. याप्रकारे चेन्नईने गुणतालिकेत आपले खाते उघडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com