lsg twitter
Sports

DC vs LSG, IPL 2025: मार्श - पुरनची तुफान फटकेबाजी! दिल्लीसमोर जिंकण्यासाठी इतक्या धावांचं आव्हान

DC vs LSG, IPL Highlights: लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या सामन्यात लखनऊला २१० धावांची गरज आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धेतील तिसरा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. विशाखापट्टणममध्ये सुरू असलेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर लखनऊला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. दरम्यान प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या लखनऊला २० षटकअखेर २०९ धावा करता आल्या आहेत.

लखनऊची दमदार सुरुवात

या सामन्यात लखनऊचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आला होता. लखनऊकडून डावाची सुरुवात करण्यासाठी मिचेल मार्श आणि एडन मार्करमची जोडी मैदानावर आली. या जोडीने संघाला ताबतडोड सुरुवात करून दिली. सलामीला फलंदाजी करताना एडन मार्करमने १३ चेंडूत १५ धावांची खेळी केली.

तर मिचेल मार्शने दिल्लीच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. मिचेल मार्शने ३६ चेंडूंचा सामना करत ७२ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ६ षटकार आणि ६ चौकार मारले. तर निकोलस पूरनने ३० चेंडूंचा सामना करत ७५ धावा चोपल्या.

या खेळीदरम्यान त्याने ६ चौकार आणि ७ षटकार मारले. या दोघांना वगळलं, तर उर्वरीत कुठल्याही फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. जर इतर फलंदाजांची साथ मिळाली असती, तर लखनऊने २२० धावांचा पल्ला गाठला असता.

दिल्लीच्या फलंदाजांबद्दल बोलायचं झालं, तर मिचेल स्टार्कने २ गडी बाद केले. तर कुलदीप यादवनेही २ गडी बाद केले. विपराज निगम, मुकेश कुमारने प्रत्येकी १-१ गडी बाद केला.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

लखनऊ सुपर जायंट्स (Playing XI): एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बडोनी, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), डेविड मिलर, प्रिन्स यादव, दिग्वेश राठी, शहबाज अहमद, शार्दुल ठाकुर, रवी बिश्नोई.

दिल्ली कॅपिटल्स (Playing XI): जेक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डु प्लेसिस, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), समीर रिजवी, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT