Delhi Capitals vs Gujarat Titans playing XI Prediction in Marathi twitter
Sports

DC vs GT, Playing XI Prediction: आज दिल्ली-गुजरात आमने-सामने! कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११?

IPL 2024 | Delhi Capitals vs Gujarat Titans Playing XI Prediction: आज होणाऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११? जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४, दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स प्लेइंग ११

आयपीएल २०२४ स्पर्धेत आज(२४ एप्रिल) ४० व्या सामन्याचा थरार रंगणार आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना दिल्लीच्या होम ग्राऊंडवर होणार आहे. त्यामुळे दिल्लीचा संघ हा सामना जिंकून गुणतालिकेत वर जाण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर दुसरीकडे गुजरात टायटन्सचा संघ सलग तिसरा विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११? जाणून घ्या.

आयपीएल २०२४ स्पर्धेत हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमने सामने येणार आहेत. गेल्या वेळी जेव्हा हे दोन्ही संघ आमने सामने आले होते त्यावेळी दिल्ली कॅपिटल्स संघाने गुजरात टायटन्स संघावर ७ गडी राखून विजय मिळवला होता. हा सामना दिल्लीने अवघ्या ९ षटकात जिंकला होता. मात्र त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाला घरच्या मैदानावर खेळताना सनरायझर्स हैदराबाद संघाकडून लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुसरीकडे गुजरात टायटन्स संघाने पंजाबवर शानदार विजय मिळवला होता.

असा राहिलाय दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड.. (Head to Head Record)

दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला, तर हे दोन्ही संघ आतापर्यंत ४ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान दोन्ही संघांना २-२ सामने जिंकता आले आहेत. हा रेकॉर्ड पाहता दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते.

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ...

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals Playing XI Prediction)

पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, जेक फ्रेजर मॅकगर्क, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, रिषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), अक्षर पटेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्खिया, मुकेश कुमार, खलील अहमद.

गुजरात टायटन्स (Gujarat Titans Playing XI Prediction)

रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, डेविड मिलर, अजमतुल्लाह उमरजई, शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, आर साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: : बीडच्या माजलगाव येथील लाहमेवाडी येथे टायर जाळत रस्ता रोको आंदोलन प्रशासनाचा निषेध

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT