आयपीएल २०२४ स्पर्धेत आतापर्यंत ३९ सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये सर्व संघांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या आहेत. इथून पुढे समीकरण आणखी किचकट होणार आहे. कारण सर्व संघ आता प्लेऑफमध्ये जाण्यासाठी पूर्ण जोर लावताना दिसून येतील. गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या राजस्थान रॉयल्स संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे.
पुढील १ सामना जिंकताच हा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करेल. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचंत टेन्शन वाढलं आहे. कारण हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर झाला आहे. केवळ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु नव्हे तर मुंबई इंडियन्स संघाच्या अडचणीत देखील वाढ झाली आहे.
आयपीएल २०२४ स्पर्धेतही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला आपला ठसा उमटवता आलेला नाही. या संघाने आतापर्यंत ८ सामने खेळले असून ७ सामने गमावले आहेत. इथून पुढे आणखी ६ सामने शिल्लक आहेत. जर या संघाला प्लेऑफच्या शर्यतीत टीकून राहायचं असेल तर, इथून पुढील सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. तरीदेखील या संघाला इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे. कुठल्याही संघाला थेट प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी १६ गुणांची गरज असते. मात्र हा संघ १६ गुणांपर्यंत पोहचू शकणार नाही.
या संघांचं प्लेऑफ गाठणं कठीण...
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसह मुंबई इंडियन्स,दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज या संघांचं देखील प्लेऑफ गाठणं कठीण दिसून येत आहे. पंजाबला ८ पैकी केवळ २ सामने जिंकता आले आहेत. तर मुंबई इंडियन्सला ८ पैकी ३ आणि दिल्ली कॅपिटल्स संघाला देखील ८ पैकी ३ सामने जिंकले आहेत. या दोन्ही संघांना प्लेऑफच्या शर्यतीत टीकून राहण्यासाठी ६ पैकी ६ किंवा कमीत कमी ५ सामने जिंकावे लागणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.