ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आयपीएल २०२४चा ३८वा सामना जयपूरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये रंगला.
या सामन्यात सर्वांचे लक्ष राजस्थानच्या लेगस्पिनर युजवेंद्र चहलकडे होते.
या सामन्यामध्ये युजवेंद्र चहलने इतिहास रचला आहे. हा पराक्रम कोणत्याही दिग्गज गोलंदाजानी आयपीएलच्या इतिहासात केले नाही.
युजवेंद्र चहल आयपीएलच्या इतिहासात सर्वाधीक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.
मोहम्म्द नबीच्या विकेटनंतर चहलने मैदानावर गुडघ्यावर बसून त्याची २०० वी विकेट साजरी केली.
चहलने आयपीएलमध्ये १५३ सामने खेळला आहे. या सामन्यांमध्ये त्यानी २०० विकेट्स घेतले.
युजवेंद्रनंतर ड्वेन ब्रावोच्या नावावर १८३ विकेट्स आहेत.