khaleel ahmed twitter
Sports

CSK vs RCB: उगाच पंगा घेतला..खलिलने सॉल्टला डिवचलं अन् अश्विनला फटका बसला; नेमकं काय घडलं?

Phil Salt vs Khaleel Ahmed: चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये सामना सुरु आहे.

Ankush Dhavre

चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सुरु आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर बंगळुरुचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आला.

डावाची सुरुवात करताना फिल सॉल्ट चेन्नईच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने आपल्या तेज तर्रार सुरुवात करुन दिली. यादरम्यान खलिल अहमद आणि फिल सॉल्ट आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले.

चेन्नईकडून डावाची सुरुवात करण्यासाठी खलिल अहमद गोलंदाजीला आला. या षटकातील सुरुवातीचे ३ चेंडू सॉल्टला खेळताच आले नाही. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर त्याने चौकार खेचले. या षटकातील पहिल्याच चेंडूवर खलिलने त्याला डिवचलं. ज्याचा संपूर्ण राग सॉल्टने अश्विनवर काढला.

पहिले षटक वेगवान गोलंदाजाने टाकल्यानंतर दुसऱ्याच षटकात आर अश्विन गोलंदाजीला आला. या षटकातील पहिल्याच चेंडूवर सॉल्टने षटकार खेचले. त्यानंतर २ चौकार खेचले. या षटकात फलंदाजी करताना सॉल्टने १६ धावा कुटल्या. त्यामुळे खलिल अहमदने सॉल्टला डिवचल्याचा फटका आर अश्विनला बसला.

असे आहेत दोन्ही संघ:

CSK (चेन्नई सुपर किंग्स) संघ - रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), दीपक हूडा,सॅम करन, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), आर. अश्विन, नूर अहमद, मथीशा पथिराना, खलील अहमद; इम्पॅक्ट प्लेअर्स: शिवम दुबे, कमलेश नागरकोटी, विजय शंकर, जेमी ओव्हर्टन, शेख रशीद

RCB (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) संघ - विराट कोहली, फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टीम डेव्हिड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, यश दयाल; इम्पॅक्ट प्लेअर्स: सुयश शर्मा, रसिख दार, मनोज भांडगे, जेकब बेथेल, स्वप्निल सिंग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

Soybean Side Effects : सोयाबीन कोणत्या व्यक्तींनी खाणं टाळावं?

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT