R Ashwin On Retirement: 'मला खेळायचं होतं, पण...',अचानक निवृत्तीचा निर्णय घेणाऱ्या अश्विनने खरं कारण सांगितलं

R Ashwin Statement On His Retirement: भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने बॉर्डर- गावसकर मालिका सुरु असताना, निवत्तीचा निर्णय घेतला होता. आता त्याने यामागचं खरं कारण सांगितलं आहे.
R Ashwin On Retirement: 'मला खेळायचं होतं, पण...',अचानक निवृत्तीचा निर्णय घेणाऱ्या अश्विनने खरं कारण सांगितलं
r ashwintwitter
Published On

भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू आर अश्विनला बॉर्डर- गावसकर मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलं होतं. ही मालिका सुरु असतानाच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता.

सर्वकाही चांगलं सुरु असताना त्याने अचानक हा निर्णय का घेतला? असे असंख्य प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान अश्विनने स्वत: निवृत्ती घेण्यामागचं कारण सांगितलं आहे. काय आहे कारण? आणि काय म्हणाला अश्विन? जाणून घ्या.

R Ashwin On Retirement: 'मला खेळायचं होतं, पण...',अचानक निवृत्तीचा निर्णय घेणाऱ्या अश्विनने खरं कारण सांगितलं
Champions Trophy: Sanju Samson वर पुन्हा अन्याय? विकेटकिपिंगसाठी ही २ नावं चर्चेत

आर अश्विन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याने आपल्या युट्युब चॅनेल, अॅश की बातमध्ये बोलताना म्हटले की, 'मला आयुष्यात काय करायचंय, याचा मी खूप विचार करतो. जेव्हा मला वाटतं की आता थांबायला हवं, तेव्हा मी थांबतो. मला पहिला कसोटी सामना खेळायची संधी मिळाली नाही. दुसर कसोटी सामना खेळलो. तिसऱ्या सामन्यात संधी मिळाली नाही. पुढे खेळायची संधी मिळेल, नाही मिळेल कोणास ठाऊक. माझी क्रिएटीव्हीटी संपली होती. त्यामुळे मी सर्व संपलंय असं ठरवलं.'

R Ashwin On Retirement: 'मला खेळायचं होतं, पण...',अचानक निवृत्तीचा निर्णय घेणाऱ्या अश्विनने खरं कारण सांगितलं
Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी गावसकर- इरफानने निवडला संघ; विराट- रोहितचं काय?

अश्विनने अचानक क्रिकेटला रामराम केला. त्याला फेअरवेल सामना खेळण्याचीही संधी मिळाली नाही. दरम्यान फेअरवेल कसोटीबाबत बोलताना तो म्हणाला की, 'जर मला फेअरवेल कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली असती, पण मी त्यासाठी पात्र नसतो तर कसं वाटलं असतं. मला केवळ फेअरवेल हवाय म्हणून संघात राहायचं नव्हतं. माझ्यात अजूनही क्रिकेट शिल्लक होतं.'

R Ashwin On Retirement: 'मला खेळायचं होतं, पण...',अचानक निवृत्तीचा निर्णय घेणाऱ्या अश्विनने खरं कारण सांगितलं
Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रोहितला पाकिस्तानात जावं लागणार; मोठं कारण आलं समोर

आर अश्विन हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे. त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १०६ कसोटी सामन्यांमध्ये ५३७ गडी बाद केले. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावे ७६५ गडी बाद करण्याची नोंद आहे. केवळ गोलंदाजी नव्हे, तर फलंदाजीतही त्याचा जलवा पाहायला मिळाला आहे. जेव्हा जेव्हा संघाला गरज होती, त्याने फलंदाजी करुनही संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com