R Ashwin On Hindi Language: हिंदी ही राष्ट्रभाषा नाही...अश्विन अण्णाच्या वक्तव्यामुळे पेटला वाद; नेमकं काय म्हणाला?

R Ashwin On Hindi Language: भारताचा माजी फिरकी गोलंदाज आर अश्विन सध्या तुफान चर्चेत आहे. त्याने हिंदी भाषेवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
R Ashwin On Hindi Language: हिंदी ही राष्ट्रभाषा नाही...अश्विन अण्णाच्या वक्तव्यामुळे पेटला वाद; नेमकं काय म्हणाला?
r ashwintwitter
Published On

भारतीय संघाचा स्टार गोलंदाज आर अश्विनने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. निवृत्ती घेतल्यानंतर अश्विन तुफान चर्चेत आला होता. आता क्रिकेटपासून दुर असताना तो वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

अश्विनने एका कॉलेज इव्हेंटला हजेरी लावली होती. या इव्हेंटमध्ये त्याने हिंदी भाषेबद्दल वक्तव्य केलं. त्याने केलेल्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

अश्विनने एका कॉलेज इव्हेंटला उपस्थिती दर्शविली. या इव्हेंटमध्ये त्याने विद्यार्थ्यांसोबत संवादही साधला. विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना त्याने विचारलं की, कोणाला हिंदीत प्रश्न विचारायचा आहे का ? मात्र कोणीही हात वर केला नाही.

R Ashwin On Hindi Language: हिंदी ही राष्ट्रभाषा नाही...अश्विन अण्णाच्या वक्तव्यामुळे पेटला वाद; नेमकं काय म्हणाला?
IND vs AUS, 2024-25: बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज

त्यापुढे बोलताना अश्विन म्हणाला, ' मला हे सांगावं वाटलं, हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही, ती अधिकृत भाषा आहे..' अश्विनने खाजगी कार्यक्रमात केलेलं हे वक्तव्य सध्या तुफान चर्चेत आहे. अश्विनच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधान आलं आहे.

R Ashwin On Hindi Language: हिंदी ही राष्ट्रभाषा नाही...अश्विन अण्णाच्या वक्तव्यामुळे पेटला वाद; नेमकं काय म्हणाला?
KL Rahul: केएल राहुलला लॉटरी लागली! Champions Trophy आधी BCCI ने दिली मोठी ऑफर

नेटकऱ्यांच्या संतप्य प्रतिक्रीया

फार कमीच लोकं असतील, जे अश्विनच्या विरोधात असतील. कारण भारतातच नाही, तर परदेशातही अश्विनचा चाहतावर्ग आहे. मात्र अश्विनने हे वक्तव्य केल्यानंतर, त्याला टिकेचा सामना करावा लागला आहे.

त्याच्या या वक्तव्यावर टीका करताना एका युजरने ट्विट करत लिहिले,' अश्विन माझा आवडता खेळाडू आहे, त्याने असं बोलायला नको होतं.' तसेच आणखी एका युजरने ट्विट करत लिहिले,' जेव्हा तुम्ही तामिळनाडूच्या बाहेर जाता, तेव्हा तुम्हाला हिंदी बोलण्यात अडचणीचा सामना करावा लागतो. तेव्हा तुमचे आयुष्य किती कठीण असते. हे अश्विनने स्वत: मुलाखतींमध्ये सांगितले आहे. '

R Ashwin On Hindi Language: हिंदी ही राष्ट्रभाषा नाही...अश्विन अण्णाच्या वक्तव्यामुळे पेटला वाद; नेमकं काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पंड्याला मोठा धक्का! Champions Trophy आधी BCCI मोठा निर्णय घेणार?

हिंदी राज्यभाषा की राष्ट्रभाषा?

दरवर्षी १४ सप्टेंबरला राष्ट्रीय हिंदी दिन साजरा केला जातो. १४ सप्टेंबर १९४९ रोजी हिंदी भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळाला. प्रत्येक राज्यात वेगळी भाषा बोलली जाते. मात्र सरकारी कार्यालयांमध्ये सर्वांना बोलता यावी आणि समजावी म्हणून हिंदीला अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com