CSK vs KKR, IPL 2024: चेपॉकवर जडेजा-तुषारचा जलवा! KKR चा विजयरथ रोखण्यासाठी CSK समोर १३८ धावांचं आव्हान
CSK vs KKR IPL 2024 Csk need 138 runs to win in chennai super kings vs kolkata knight riders match amd2000 twitter
क्रीडा | T20 WC

CSK vs KKR, IPL 2024: चेपॉकवर जडेजा-तुषारचा जलवा! KKR चा विजयरथ रोखण्यासाठी CSK समोर १३८ धावांचं आव्हान

Ankush Dhavre

CSK vs KKR, IPL 2024 Live Update:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील २२ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर नाणेफेक गमावलेला कोलकाता नाईट रायडर्सचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला. या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांनी केकेआरच्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यात अडकवलं. त्यामुळे केकेआरला पहिल्या डावात २० षटकअखेर १३७ धावा करत्या आल्या आहेत.

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय चेन्नईच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. चेन्नईकडून गोलंदाजी करताना रविंद्र जडेजा हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकात अवघ्या १८ धावा खर्त करत ३ गडी बाद केले. तर तुषार देशंपाडेने ३३ धावा खर्च करत ३ गडी बाद केले. यासह फिरकी गोलंदाज महिश थिक्षणाने देखील १ गडी बाद केला. एकंदरीत चेन्नईचे गोलंदाज केकेआरच्या गोलंदाजांवर भारी पडले. (Cricket news in marathi)

केकेआरने केल्या. ..धावा..

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हती. पहिल्याच चेंडूवर फिल सॉल्ट बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर फलंदाजी करताना सुनील नरेनने २७ आणि अंगक्रिश रघुवंशीने २४ धावा केल्या. शेवटी कर्णधार श्रेयस अय्यरने काही महत्वपूर्ण धावा जोडल्या आणि संघाची धावसंख्या १३७ धावांवर पोहचवली.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन):

फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन):

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रविंद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार), शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे, महेश थिक्षाना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan News : सलमान खान घरावर गोळीबार घडवून आणणाऱ्याच्या मुसक्या आवळणार, पोलिसांनी आखला मोठा प्लान

CM Eknath Shinde: आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन

Jayant Patil News | जयंत पाटलांचे आधी बॅनर फाडले, नंतर माफी मागण्याचा इशारा दिला! छ.संभाजीनगरात नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Updates: अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक

Lok Sabha Speaker Election : पराभव पक्का तरीही काँग्रेस का लढली? लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुकीआडून कोणता मेगा प्लान आखला होता?

SCROLL FOR NEXT