CSK vs KKR : मॅच होण्याआधीच चेन्नईला मिळाली खुशखबर; संघात स्टार खेळाडूची एन्ट्री

CSK vs KKR match update : गुणतालिकेत कोलकाता दुसऱ्या स्थानावर आहे . चेन्नईने सलग दोन सामने गमावल्यानंतर चाहत्यांमध्ये निराशा आहे. याचदरम्यान, चेन्नईच्या संघाला खूशखबरी मिळाली आहे.
CSK vs KKR : मॅच होण्याआधीच चेन्नईला मिळाली खुशखबर; संघात स्टार खेळाडूची एन्ट्री
csk vs kkr saam tv
Published On

Star Player Returns To Chennai:

आयपीएल २०२४ हंगामाचा २२ वा सामना आज सोमवारी चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स या दोन संघादरम्यान होणार आहे. आजचा सामना दोन्ही संघाचा महत्वाचा आहे. चेन्नईने एकामागोमाग दोन सामने गमावले आहेत. तर गुणतालिकेत कोलकाता दुसऱ्या स्थानावर आहे . चेन्नईने सलग दोन सामने गमावल्यानंतर चाहत्यांमध्ये निराशा आहे. याचदरम्यान, चेन्नईच्या संघाला खूशखबरी मिळाली आहे.

स्टार खेळाडूची होणार चेन्नई संघात एन्ट्री

कोलकाता नाइट रायडर्सच्या विरोधात चांगला सामना होऊ शकतो. धोनीच्या संघाचा स्पर्धेत कमबॅक करण्याचा मोठा प्रयत्न असणार आहे. या सामन्यात कोलकाताचा विजय झाल्यास , हा संघ गुणतालिकेत टॉपवर पोहोचू शकतो. (ipl)

CSK vs KKR : मॅच होण्याआधीच चेन्नईला मिळाली खुशखबर; संघात स्टार खेळाडूची एन्ट्री
RR VS RCB: अरे देवा! IPl मध्ये ८ वं शतक ठोकल्यानंतरही विराटच्या नावावर झाला नकोसा विक्रम

तर आजचा सामना चेन्नईने गमावल्यास गुणतालिकेत संघाची स्थिती खराब होण्याची शक्यता आहे.यामुळे संघाला प्लेऑफ खेळणंही अवघड जाईल. या कारणामुळे चेन्नई सुपर किंग्ससाठी आजचा सामना महत्वाचा आहे. याचदरम्यान, संघात स्टार खेळाडूची एन्ट्री होणार आहे. हा स्टार खेळाडू बांग्लादेशचा जलद गोलंदाज मुस्तफिजुर रहमान आहे.

CSK vs KKR : मॅच होण्याआधीच चेन्नईला मिळाली खुशखबर; संघात स्टार खेळाडूची एन्ट्री
MI vs DC, IPL 2024: मुंबईला अखेर विजयाचा सूर गवसला! शेफर्डच्या वादळानं पलटणचा दिल्लीवर शानदार विजय

आयपीएलमध्ये मुस्तफिजुरची चांगली कामगिरी

मुस्तफिजुर रहमान हैदराबादच्या विरोधात खेळण्यात आलेल्या सामन्यात तो संघात नव्हता. चेन्नईने हैदराबादच्या विरोधात ५ एप्रिलला खेळला. त्यावेळी मुस्तफिजुर बांग्लादेशमध्ये विजाच्या कामासाठी गेला होता. त्या सामन्यापासून चेन्नईला पराभवाला सामोरे जावं लागलं. त्या सामन्यात चेन्नईला जलद गोलंदाजाची कमतरता जाणवली.

सध्या मुस्तफिजुर चांगल्या फॉर्ममध्ये आहे. या सिझनमध्ये त्याने ३ सामने खेळले आहेत. त्याने तीन सामन्यात ७ गडी बाद केले आहेत. तर पर्पल कॅप देखील त्याने काही दिवसांत मिळवली होती. सध्या पर्पल कॅप युजवेंद्र चहलकडे आहे. त्याने ४ सामन्यात ८ गडी बाद केले आहेत. मुस्तफिजुर रहमानच्या संघात एन्ट्रीने चेन्नईला मोठं बळ मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com