CSK vs KKR,IPL 2024: चेन्नईसमोर केकेआरचा विजयरथ रोखण्याचं आव्हान! कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड?
CSK vs KKR, Head To Head Record News:
आयपीएल २०२४ स्पर्धेतील २२ वा सामना तुफान कामगिरी करत असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर रंगणार आहे. ३ पैकी ३ सामने जिंकलेला कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आता चेन्नईला आपल्याच होम ग्राऊंडवर पराभूत करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान कोण कोणावर भारी पडणार? आणि कसा राहिलाय दोन्ही संघाचा हेड टू हेड रेकॉर्ड? जाणून घ्या.
असा राहिलाय CSK vs KKR चा हेड टू हेड रेकॉर्ड..
कोलकाता नाईट रायडर्सचा संघ या हंगामात दमदार फॉर्ममध्ये असला तरीदेखील एकंदरीत रेकॉर्डमध्ये चेन्नईचा संघ आघाडीवर आहे. यासह चेन्नईसाठी जमेची बाजू अशी की, चेपॉकमध्ये खेळताना कोलकाता नाईट रायडर्स संघाला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही.
दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ ३१ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान चेन्नईने १९ सामने जिंकले आहेत. तर कोलकाता नाईट रायडर्स संघाला ११ सामने जिंकता आले आहेत. एक सामना अनिर्णीत राहिला आहे. तर गेल्या ६ सामन्यातील रेकॉर्ड पाहिला तर, चेन्नई सुपर किंग्ज संघाने ४ सामने जिंकले आहेत. तर कोलकाता नाईट रायडर्स संघाला केवळ २ सामने जिंकता आले आहेत. (Cricket news in marathi)
चेपॉकमध्ये खेळताना असा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड..
सामने -१०
चेन्नईने जिंकलेले सामने - ७
कोलकाताने जिंकलेले सामने - ३
चेपॉकमध्ये खेळताना चेन्नई सुपर किंग्ज संघाची कामगिरी..
एकूण सामने - ६६
विजय - ४७
पराभव - १८
कोलकाता नाईट रायडर्स संघाचा चेपॉकमध्ये खेळताना असा राहिलाय रेकॉर्ड..
सामने -१३
विजय -४
पराभव - ९
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.