cricket australia announced their final squad for Icc t20 world cup 2024 jake Jake Fraser-McGurk named in squad amd2000 saam tv news
Sports

Australia Squad: T-20 WC आधी ऑस्ट्रेलिया संघात मोठा बदल! १५ चेंडूत अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजाला संघात स्थान

Australia Squad For T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या अंतिम संघाची घोषणा केली आहे.

Ankush Dhavre

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या अंतिम संघाची घोषणा केली आहे. या संघात युवा आक्रमक फलंदाज जॅक फ्रेजर मॅकगर्क आणि युवा अष्टपैलू खेळाडू मॅथ्यू शॉर्टला राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आलं आहे.

जॅक फ्रेजर मॅकगर्कने आयपीएल २०२४ स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. याच कामगिरीची दखल घेत त्याला संघात स्थान दिलं गेलं आहे. तो टी-२० वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलिया संघासोबत अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये जाणार आहे. मात्र जोपर्यंत कुठलाही खेळाडू दुखापतग्रस्त होत नाही किंवा स्पर्धेतून बाहेर पडत नाही, तोपर्यंत या खेळाडूंचा मुख्य संघात समावेश करण्यात येणार नाही.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या प्रमुख १५ खेळाडूंच्या संघात कुठलाही बदल केलेला नाही. जॅक फ्रेजर मॅकगर्कला डेव्हिड वॉर्नरची रिप्लेसमेंट म्हणून पाहिलं जात असावं. कारण तो आयपीएल २०२४ स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यात खेळताना दिसून आला नव्हताय. त्याच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे डेव्हिड वॉर्नर या स्पर्धेतून बाहेर पडला, तर त्याच्याऐवजी जॅक फ्रेजर मॅकगर्कचा मुख्य संघात समावेश केला जाऊ शकतो. तर कुठला अष्टपैलू खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास मॅथ्यू शॉर्टचा संघात समावेश केला जाऊ शकतो.

यापूर्वी राखीव खेळाडू म्हणून तनवीर सांघाचा संघात समावेश करण्यात आला होता. मात्र तो दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे त्याला संघाबाहेर करण्यात आलं आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना त्याने धावांचा पाऊस पाडला.

ही कामगिरी पाहता त्याला ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख १५ सदस्यीय संघात स्थान मिळण्याची चर्चा होती. मात्र त्याला दुर्लक्ष करण्यात आलं होतं. ऑस्ट्रेलिया संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी मिचेल मार्शवर सोपवण्यात आली आहे. तर टिम डेव्हिड, ग्लेन मॅक्सवेल, एश्टन एगर या आक्रमक फलंदाजांना संघात स्थान देण्यात आलं आहे.

या स्पर्धेसाठी असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ

मिचेल मार्श (कर्णधार), एश्टन एगर, पॅट कमिन्स, टिम डेव्हिड, नाथन एलिस, कॅमरुन ग्रीन, जोश हेजलवुड, ट्रेव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), डेव्हिड वॉर्नर आणि अॅडम झाम्पा.

राखीव खेळाडू - जॅक फ्रेजर मॅकगर्क, मॅथ्यू शॉर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : घराच्या जमिनीचे आणि प्रेमाचे प्रश्न सुटणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

Ind vs Eng, 5th Test, Day 3: जैस्वालचा 'यशस्वी' धमाका, जडेजा, वॉशिंगटनची 'सुंदर' खेळी, भारताचं इंग्लंडला 374 धावांचं आव्हान

Pigeons: मुंबईतील कबुतरखान्यावरून नवा वाद; नेमकं कारण काय? मुंबईत किती आहेत कबुतरखाने?

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हिंदीचा कळवळा; शेकापच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा हल्ला, VIDEO

Mumbai Crime : एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली, तर...; 5 लाखांची खंडणी घेताना माजी नगरसेवकाला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT