India vs Australia 1st T20I: इशान किशन की जितेश शर्मा? प्लेइंग ११ मध्ये कोणाला मिळणार चान्स; सूर्याने केला खुलासा

Team India Playing XI: इशान किशन की जितेश शर्मा या दोघांपैकी प्लेइंग ११ मध्ये कोणाला स्थान दिलं जाईल,जाणून घ्या.
jitesh-sharma-and-ishan-kishan
jitesh-sharma-and-ishan-kishansaam tv news

IND vs AUS , Team India Playing 11:

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेनंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहेत. या मालिकेतील पहिला टी-२० सामना विशाखापट्टनमच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या मालिकेसाठी जितेश शर्मा आणि इशान किशन या दोघांना यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात स्थान दिलं गेलं आहे. या दोघांपैकी कोणाला संधी मिळणार याबाबत सूर्यकुमार यादवने खुलासा केला आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानूसार सूर्यकुमार यादव इशान किशनचा उल्लेख करत म्हणाला की,' तो सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. तो नेट्समध्ये कसुन मेहनत करतो. त्याने आशिया चषक आणि वर्ल्डकप स्पर्धेत आपली भूमिका योग्यरित्या पार पाडली आहे. तो प्लेइंग ११ मध्ये खेळण्यासाठी प्रबळ दावेदार आहे, मात्र याबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही.'

वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचं प्रतिनिधित्व..

डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज इशान किशनने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याला या स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. या सामन्यात त्याने ४७ धावांची तुफानी खेळी केली.

jitesh-sharma-and-ishan-kishan
IND vs AUS T20I: हॉटस्टार नव्हे तर इथे फुकटात पाहा भारत- ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचा थरार! कुठे अन् कसा पाहाल सामना? जाणून घ्या...

अशी राहिलीये कामगिरी..

तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात तो शून्यावर बाद होऊन माघारी परतला होता. त्याची वनडे क्रिकेटमधील कामगिरी पाहिली तर, त्याने २७ वनडे सामन्यांमध्ये ९३३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या नावे दुहेरी शतक झळकावण्याची नोंद आहे. तर टी-२० क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने २९ टी-२० सामन्यांमध्ये ६८६ धावा केल्या आहेत. (Latest sports updates)

jitesh-sharma-and-ishan-kishan
IND vs AUS 1st T20I: भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या टी-२० साठी टीम इंडिया सज्ज; ऋतुराज नव्हे तर हा फलंदाज करणार डावाची सुरुवात

अशी राहिलीये जितेशची कामगिरी..

तर जितेश शर्माच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याला भारतीय संघासाठी ३ टी-२० सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. तर त्याच्या देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने १०० टी-२० सामन्यांमध्ये २२०८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि १० अर्धशतकं झळकावली आहेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com