IPL 2024, Qualifier 1: KKR vs SRH सामना रद्द होणार? समोर आली मोठी अपडेट

KKR vs SRH, Weather Update: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.
IPL 2024, Qualifier 1: KKR vs SRH सामना रद्द होणार? समोर आली मोठी अपडेट
KKR vs SRH IPL 2024 qualifier 1 weather update and weather prediction amd2000saam tv news

आयपीएल २०२४ स्पर्धेतील प्लेऑफच्या सामन्यांना आजपासून प्रारंभ होणार आहे. क्वालिफायर १ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि सन रायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. आतापर्यंत या स्पर्धेतील ३ सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. दरम्यान आज होणाऱ्या सामन्यात कसं असेल हवामान? जाणून घ्या.

हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण हा सामना जिंकणाऱ्या संघाला थेट फायनलचं तिकीट मिळणार आहे. दरम्यान क्रिकेट चाहत्यांसाठी गुड न्यूज अशी की, या सामन्यात पाऊस पडणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यादिवशी. तापमान ३८-४२ डिग्री सेल्सिअस इतकं असेल.

IPL 2024, Qualifier 1: KKR vs SRH सामना रद्द होणार? समोर आली मोठी अपडेट
IPL Playoffs, Qualifier 1: पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोणाला मिळणार फायनलचं तिकीट?

पावसामुळे ३ सामने रद्द

आतापर्यंत या स्पर्धेतील ७० सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान ३ सामने पावसामुळे पूर्ण होऊ शकलेले नाही. हे सामने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. ३ मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यादरम्यान झालेला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. १६ मे रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना देखील पावसामुळे रद्द करण्यात आला. यासह साखळी फेरीतील शेवटचा सामना देखील पावसामुळे धुतला गेला.

IPL 2024, Qualifier 1: KKR vs SRH सामना रद्द होणार? समोर आली मोठी अपडेट
KKR vs SRH,IPL Playoff: केकेआर नव्हे तर हैदराबादलाच मिळणार फायनलचं तिकीट! चक्रावून टाकणारी आकडेवारी एकदा पाहाच

असे आहेत दोन्ही संघ

सनरायझर्स हैदराबाद

ट्रैविस हेड, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टिरक्षक), अब्दुल समद, शाहबाज़ अहमद, सनवीर सिंग, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, विजयकांत व्यासकांत, टी नटराजन, अभिषेक शर्मा, उमरान मलिक, मयंक अगरवाल, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, मार्को जानसेन, मयंक मारकंडे,उपेंद्र यादव, झटवेध सुब्रमण्यन, फजलहक फारूकी, आकाश महाराज सिंग, एडेन मार्कराम, राहुल त्रिपाठी, अनमोलप्रीत सिंग.

कोलकाता नाईट रायडर्स

रहमानुल्लाह गुरबाज (यष्टिरक्षक), सुनील नारायण, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, नितीश राणा, आंद्रे रसेल, रमनदीप सिंग, मिशेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोड़ा, अनुकूल रॉय, दुष्मंथा चमीरा, श्रीकर भरत, चेतन सकारिया, शेरफेन रदरफोर्ड, साकिब हुसेन, अल्लाह गजनफर, सुयश शर्मा, अंगकृष रघुवंशी, मनीष पांडे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com