Jofra Archer trick Quinton de Kock century saam tv
Sports

Jofra Archer: चिटर...! क्विंटन डी कॉकचं शतक होऊ नये म्हणून जोफ्रा आर्चरचा रडीचा डाव, नेटिझन्सनी दाखवला इंगा

Jofra Archer trick Quinton de Kock century: राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होत आहे. अनेक क्रिकेटप्रेमींनी सोशल मीडियावर आर्चरवर टीका करत त्याने क्विंटन डी कॉकचे शतक रोखण्यासाठी कपटी डाव खेळल्याचा आरोप केला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

बुधवारी गुवाहाटीमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या विजयाचं खातं उघडलं. कोलकाताने राजस्थान रॉयल्सचा ८ विकेट्सने पराभव केला. कोलकाता नाईट रायडर्सने हा सामना १५ चेंडू शिल्लक असताना जिंकला. यावेळी केकेआरचा फलंदाज क्विंटन डी कॉकने राजस्थान रॉयल्स विरुद्ध ६१ चेंडूत नाबाद ९७ रन्स केले. क्विंटन डी कॉकने १५९.०१ च्या स्ट्राईक रेटने रन्स केले. यावेळी त्याने त्याच्या खेळीत ८ चौकार आणि ६ सिक्स लगावले. या खेळीसाठी क्विंटन डी कॉकला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कारही देण्यात आला.

दरम्यान अशातच राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर सोशल मीडियावर ट्रोल होतोय. सोशल मीडियावरील अनेक चाहते जोफ्रा आर्चरवर क्विंटन डी कॉकचं शतक रोखण्यासाठी डाव खेळण्याचा आरोप करतायत.

काय केलं जोफ्रा आर्चरने?

कोलकाता नाईट रायडर्सच्या डावाच्या १८ व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. ज्यावेळी क्विंटन डी कॉक ८१ रन्स करून त्याच्या तिसऱ्या आयपीएल शतकाच्या जवळ होता. यावेळी जोफ्रा आर्चर केकेआरच्या डावातील १८ वी ओव्हर टाकत होता. क्विंटन डी कॉकला तिसरं आयपीएल शतक पूर्ण करण्यासाठी १९ रन्सची आवश्यकता होती आणि कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी १७ धावांची आवश्यकता होती.

१८ व्या ओव्हरमध्ये जोफ्रा आर्चरच्या पहिल्या दोन चेंडूंवर क्विंटन डी कॉकने एक चौकार आणि एक सिक्स मारला. यानंतर क्विंटन डिकॉकचा स्कोर ९१ झाला. यावेळी कोलकाता नाईट रायडर्सला जिंकण्यासाठी ७ रन्सची आवश्यकता होती. क्विंटन डी कॉकला त्शतक पूर्ण करण्यासाठी 9 रन्सची गरज होती.

मात्र यानंतर जोफ्रा आर्चरने जे केलं त्यामुळे सर्वचजण आश्चर्यचकित झाले. याच ओव्हरमध्ये जोफ्रा आर्चरने पुढचे दोन चेंडू वाईड टाकले आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) ला फक्त ५ रन्स शिल्लक राहिले.

सोशल मीडियावर चाहत्यांनी केलं ट्रोल

पुढच्याच बॉलवर क्विंटन डी कॉकने सिक्स मारला पण तो ९७ रन्सवर नाबाद राहिला. क्विंटन डी कॉकचे शतक रोखल्यामुळे जोफ्रा आर्चरवर आरोप लावला जातोय. सोशल मीडियावर चाहत्यांकडून आरोप केला जातोय की, जोफ्रा आर्चरने १८ व्या ओव्हरमध्ये जाणूनबुजून दोन वाईड बॉल टाकले जेणेकरून क्विंटन डी कॉक त्याचे शतक पूर्ण करू शकला नाही.

कोलकाताचा पहिला विजय

वरुण चक्रवर्ती आणि मोईन अली यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर केकेआरने रॉयल्सला ९ बाद १५१ रन्सवर रोखलं. क्विंटन डी कॉकने ६१ बॉल्समध्ये आठ फोर आणि सहा सिक्ससह ९७ रन्सची नाबाद खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जीवावर केकेआरला १७.३ ओव्हर्समध्ये सहज लक्ष्य पार करण्यास मदत झाली. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली केकेआरने यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या विजयाची नोंद केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BOI Recruitment: खुशखबर! बँक ऑफ इंडियात नोकरी अन् १.२० लाख रुपये पगार; अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय? वाचा

Haldi Kunku Gift Idea : बेस्ट हळदी–कुंक वाण आयडिया, उपयोगी आणि बजेटमध्ये बसणाऱ्या खास वस्तू

Leopard News : बिबट्या अकोल्यात पोहचला, बाळापूरमध्ये ४ पिल्लांसह आढळला, एक शेतकर्‍याच्या हाती लागले, पण...

Maharashtra Live News Update: जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ

Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेतून ६ लाख शेतकऱ्यांना वगळले? तुम्हाला ₹२००० मिळणार की नाही? असं करा चेक

SCROLL FOR NEXT