big update on suryakumar yadav fitness ahead ot t20 world cup 2024 amd2000 twitter
Sports

T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकपपूर्वी सूर्यकुमार यादवच्या फिटनेसबाबत समोर आली मोठी अपडेट

Suryakumar Yadav Fitness Update: आयपीएल २०२४ स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघ मिशन टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी वेस्टइंडीजला रवाना होणार आहे. येत्या १ जूनपासून वेस्टइंडीज आणि अमेरिकेत या स्पर्धेचा थरार रंगणार आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघ मिशन टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी वेस्टइंडीजला रवाना होणार आहे. येत्या १ जूनपासून वेस्टइंडीज आणि अमेरिकेत या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघसाठी सकारात्मक बाब समोर आली आहे. संघातील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवच्या फिटनेसमध्ये सुधारणा झाली आहे. तसेच टी-२० वर्ल्डकपपर्यंत तो पूर्णपणे फिट होईल, असं म्हटलं जात आहे. सध्या तो मुंबई इंडियन्स संघाचं प्रतिनिधित्व करत असून, या संघासाठी शानदार कामगिरी करतोय.

पंजाबविरुद्ध तुफान फटकेबाजी..

पंजाब किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने शानदार विजय मिळवला. या विजयात सूर्यकुमार यादवने मोलाचं योगदान दिलं आहे. या सामन्यात त्याने ५३ चेंडूंचा सामना करत ७८ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ७ चौकार आणि ३ षटकार मारले. दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला शून्यावर माघारी परतावं लागलं होतं. मात्र त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने अवघ्या १७ चेंडूंचा सामना करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं होतं.

आयपीएल २०२४ स्पर्धेत शानदार कामगिरी...

गेले काही महिने दुखापतग्रस्त राहिल्यानंतर अखेर सूर्यकुमार यादवने आयपीएल २०२४ स्पर्धेतून कमबॅक केलं आहे. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात १९ चेंडूंचा सामना करत ५२ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार आणि ४ षटकार मारले. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तो शून्यावर बाद होऊन माघारी परतला. या हंगामातील ४ सामन्यांमध्ये तो २ वेळेस शून्यावर माघारी परतला आहे. तर २ सामन्यांमध्ये त्याने २ अर्धशतकी खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shatank Yog 2025: शनी-बुध ग्रहाच्या युतीने या राशींचं नशीब बदलणार; लवकरच पूर्ण होणार सर्व इच्छा

Fact Check : अवतार-3 मध्ये गोविंदा विशेष भूमिकेत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Maheshwari Saree Designs: साध्या पण दिसायला भारी महेश्वरी साड्यांची भलतीच क्रेझ, या आहेत 5 डिझाईन्स

Two New Airlines:नव्या दोन एअरलाईन्सची विमानं आकाशात भरणार उड्डाण; केंद्र सरकारची मंजुरी

'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

SCROLL FOR NEXT