PBKS vs MI: भविष्यातील मिस्टर 360! बुमराह,कोएत्जीच्या गोलंदाजीवर आशुतोषची 'सूर्या' स्टाईल फटकेबाजी - Video

Ashutosh Sharma Batting Against Mumbai Indians: एकतर्फी विजयाची स्वप्न पाहणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचं टेन्शन वाढवणाऱ्या आशुतोष शर्माने मैदानाच्या चारही बाजूंना तुफान फटकेबाजी केली.
punjab kings star batter ashutosh sharma power hitting against jasprit bumrah gerald coetzee watch video amd2000
punjab kings star batter ashutosh sharma power hitting against jasprit bumrah gerald coetzee watch video amd2000twitter

पंजाब किंग्ज संघातील युवा फलंदाज सध्या लक्षवेधी कामगिरी करताना दिसून येत आहेत. लिलावात चुकून घेतलेल्या शशांक सिंगने स्वत:ला सिद्ध केल्यानंतर आता आशुतोष शर्माने लक्षवेधी कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने मैदानाचा एकही कोपरा सोडला नाही जिथे त्याने चेंडू पोहचवला नसेल.

एकतर्फी विजयाची स्वप्न पाहणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचं टेन्शन वाढवणाऱ्या आशुतोष शर्माने मैदानाच्या चारही बाजूंना तुफान फटकेबाजी केली. त्याने अर्धशतकी खेळी करत पंजाबला जवळजवळ विजय मिळवून दिला होता. शेवटी तो बाद झाला आणि पंजाबच्या हातून सामना निसटला.

आशुतोषची तुफान फटकेबाजी..

आशुतोष शर्माने या सामन्यात फलंदाजी करताना २८ चेंडूंचा सामना करत २ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ६१ धावांची खेळी केली. त्याने जसप्रीत बुमराह, गेराल्ड कोएत्जीसारख्या वर्ल्डक्लास गोलंदाजांविरुद्ध खेळताना ३६० डिग्री फलंदाजी केली. भले भले फलंदाज जसप्रीत बुमराहसमोर फलंदाजी करताना थर थर कापतात. मात्र या फलंदाजाने बुमराहच्या गोलंदाजीवर खाली बसुन स्विप शॉट मारला. हा चेंडू थेट सीमारेषेबाहेर गेला.

punjab kings star batter ashutosh sharma power hitting against jasprit bumrah gerald coetzee watch video amd2000
Hardik Pandya Statement: 'IPL मध्ये हे होतच..' पंजाबला धूळ चारल्यानंतर काय म्हणाला हार्दिक पंड्या?

आशुतोषच्या फलंदाजीत सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीची झलक पाहायला मिळाली. सूर्यकुमार यादव ज्या पद्धतीने थर्ड मॅनच्या वरुन शॉट मारतो. असेच काहीसे शॉट आशुतोष शर्मा खेळताना दिसून आला आहे. आकाश मधवालच्या गोलंदाजीवर त्याने किपरच्या वरुन षटकार मारला. त्याची फलंदाजी स्टाईल पाहून त्याला भविष्यातील मिस्टर ३६० असं म्हटलं जाऊ लागलं आहे.

या सामन्याहबद्दल बोलायचं झालं, तर पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्यकडून प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ७८ धावांची खेळी केली. मुंबईने २० षटकअखेर ७ गडी बाद १९२ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्ज संघाकडून आशुतोष शर्माने सर्वाधिक ६१ धावांची खेळी करत संघाला विजयाच्या जवळ पोहचवलं. मात्र संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. हा सामना मुंबई इंडियन्सने ९ धावांनी जिंकला.

punjab kings star batter ashutosh sharma power hitting against jasprit bumrah gerald coetzee watch video amd2000
IPL 2024: पर्पल कॅपच्या यादीत बुमराह नंबर १! ऑरेंज कॅपसाठी विराटला या फलंदाजांकडून कडवी झुंज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com