Ashutosh Singh: युवराजचा रेकॉर्ड मोडला, आता गुजरातच्या गोलंदाजांचा घाम काढणारा आशुतोष आहे तरी कोण?

Who Is Ashutosh Sharma: पंजाबला विजय मिळवून देणाऱ्या या खेळाडूने युवराज सिंगचा देखील रेकॉर्ड मोडून काढला आहे. कोण आहे आशुतोष शर्मा? जाणून घ्या.
Who is ashutosh sharma the hero of punjab kings victory against gujarat titans amd2000
Who is ashutosh sharma the hero of punjab kings victory against gujarat titans amd2000twitter

Who Is Ashutosh Sharma News In Marathi:

गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यात पंजाबने शानदार विजय मिळवला. या विजयात पंजाबचा विस्फोटक फलंदाज आशुतोष शर्माने मोलाचं योगदान दिलं. त्याने १७ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३१ धावांची विस्फोटक खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. मुख्य बाब म्हणजे त्याने ही खेळी तेव्हा केलों, जेव्हा संघाला खूप गरज होती. पंजाबला विजय मिळवून देणाऱ्या या खेळाडूने युवराज सिंगचा देखील रेकॉर्ड मोडून काढला आहे. कोण आहे आशुतोष शर्मा? जाणून घ्या.

आपल्या आक्रमक खेळीने लक्ष वेधून घेणाऱ्या आशुतोषचा जन्म १५ सप्टेंबर १९९८ रोजी मध्यप्रदेशच्या रतलाममध्ये झाला. सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो रेल्वे संघाचं प्रतिनिधित्व करतो. यापूर्वी तो मध्यप्रदेश संघासाठी खेळायचा. माध्यमातील वृत्तानुसार, २०२० मध्ये जेव्हा चंद्रकांत पंडित यांची मध्यप्रदेश संघाच्या मुख्यप्रशिक्षकपदी वर्णी लागल्यानंतर त्याला बाहेर केलं गेलं होतं. त्यानंतर तो रेल्वे संघाकडून खेळू लागला. असं म्हटलं जातं की, भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू नमन ओझाने त्याला इथपर्यंत पोहचवण्यात मदत केली. (Cricket news in marathi)

Who is ashutosh sharma the hero of punjab kings victory against gujarat titans amd2000
SRH vs CSK, IPL 2024: चेन्नईसमोर हैदराबादचं आव्हान! कशी असेल प्लेइंग ११? वाचा पिच रिपोर्च अन् मॅच प्रेडिक्शन

युवराजचा रेकॉर्ड मोडला...

आशुतोष शर्मा हा गतवर्षी झालेल्या सैय्यद मुश्ताक अली स्पर्धेत तुफान चर्चेत आला होता. या स्पर्धेत गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरत त्याने ११ चेंडूत वादळी अर्धशतक झळकावलं होतं. या वादळी खेळीसह त्याने युवराज सिंगचा रेकॉर्ड मोडून काढला होता. हा कारनामा त्याने अरुणाचल संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात केला होता.

Who is ashutosh sharma the hero of punjab kings victory against gujarat titans amd2000
IPL 2024, Points Table: पंजाबच्या विजयाने गुणतालिकेत मोठी उलथापालथ! या २ संघांना मोठा धक्का

यासह त्याने युवराज सिंगचा सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा रेकॉर्ड मोडून काढला होता. टी -२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा रेकॉर्ड हा माजी भारतीय फलंदाज युवराज सिंगच्या नावे होता. युवराज सिंगने टी -२० वर्ल्डकप २००७ स्पर्धेत अवघ्या १२ चेंडूंचा सामना करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं होतं. हा रेकॉर्ड इतक्या वर्षांपासून कोणालाच मोडता आला नव्हता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com