SRH vs CSK, IPL 2024: चेन्नईसमोर हैदराबादचं आव्हान! कशी असेल प्लेइंग ११? वाचा पिच रिपोर्च अन् मॅच प्रेडिक्शन

SRH vs CSK Playing 11 Prediction And Match Details: आजा होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.
SRH vs CSK, IPL 2024: चेन्नईसमोर हैदराबादचं आव्हान! कशी असेल प्लेइंग ११? वाचा पिच रिपोर्च अन् मॅच प्रेडिक्शन
SRH vs CSK IPL 2024 Match prediction playing 11 pitch report and match details sunrisers hyderabad vs chennai super kings news in marathi twitter/yandex
Published On

SRH vs CSK Playing 11 Prediction, Pitch Report And Match Prediction:

आयपीएल २०२४ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा रोमांचक सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. दोन्ही संघ तुफान फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये जोरदार लढत पाहायला मिळू शकते. एकीकडे आयपीएल स्पर्धेतील ५ वेळचा विजेता संघ तर दुसरीकडे आयपीएल स्पर्धेत सर्वोच्च धावसंख्या करणारा संघ असणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११? खेळपट्टी आणि मॅच प्रेडीक्शन? जाणून घ्या एकाच क्लिकवर.

कशी असेल खेळपट्टी?

हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रंगणार आहे. या मैदानावरील रेकॉर्ड पाहिला तर, गेल्या काही सामन्यांमध्ये या मैदानावर धावांचा पाऊस पाहायला मिळाला आहे. त्यामुळे या सामन्यातही धावांचा पाऊस पडणार यात काहीच शंका नाही. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या देखील याच मैदानावर बनवली गेली होती. मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना सनरायझर्स हैदराबाद संघाने २० षटक अखेर २७७ धावांचा डोंगर उभारला होता. (Cricket news in marathi)

SRH vs CSK, IPL 2024: चेन्नईसमोर हैदराबादचं आव्हान! कशी असेल प्लेइंग ११? वाचा पिच रिपोर्च अन् मॅच प्रेडिक्शन
Shubman Gill Statement: हातचा सामना निसटल्यानंतर शुभमन गिल भडकला! पराभवाचं कारण सांगत म्हणाला...

मॅच प्रेडीक्शन..

या स्पर्धेत दोन्ही संघांचा रेकॉर्ड पाहिला तर, चेन्नई सुपर किंग्ज संघाने ३ सामने खेळले आहेत आणि २ जिंकले आहेत. तर हैदराबादने ३ सामने खेळले असून २ गमावले आहेत. हा रेकॉर्ड पाहता चेन्नईचा संघ सन रायझर्स हैदराबादवर भारी पडू शकतो.

SRH vs CSK, IPL 2024: चेन्नईसमोर हैदराबादचं आव्हान! कशी असेल प्लेइंग ११? वाचा पिच रिपोर्च अन् मॅच प्रेडिक्शन
IPL 2024, Points Table: पंजाबच्या विजयाने गुणतालिकेत मोठी उलथापालथ! या २ संघांना मोठा धक्का

या सामन्यासाठी अशी असू शकते चेन्नई सुपर किंग्ज संघाची प्लेइंग ११...

रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड़, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, डॅरिल मिशेल, समीर रिजवी, रविंद्र जडेजा, एमएस धोनी, दीपक चाहर, तुषार देशपांडे, मथीशा पथिराना/शार्दुल ठाकुर.

इम्पॅक्ट प्लेअर- महीश थीक्षाना/मथीशा पथिराना.

सनरायझर्स हैदराबाद संघाची प्लेइंग ११..

मयांक अगरवाल, ट्रेवीस हेड, अभिषेक शर्मा, एडेन मार्करम, हेनरिक क्लासेन, अब्दुल समद, शाहबाज़ अहमद, पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार, मयांक मारकंडे, जयदेव उनाडकट.

इम्पॅक्ट प्लेअर- वॉशिंग्टन सुंदर/उमरान मलिक.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com