mohammed shami yandex
Sports

Ranji Trophy: बॉर्डर- गावसकर ट्रॉफीआधी टीम इंडियासाठी गुड न्यूज! Mohammed Shami संघात परतला

Border Gavaskar Trophy, Mohammed Shami: बॉर्डर- गावसकर मालिकेआधी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.

Ankush Dhavre

Mohammed Shami News In Marathi: भारतीय संघ बॉर्डर- गावसकर ट्रॉफीसाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेनंतर दुखापतीमुळे संघाबाहेर झालेला भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. तो आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये आपला शेवटचा सामना खेळताना दिसून आला होता. त्यानंतर दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर व्हावं लागलं होतं.

रणजी ट्रॉफीतून करणार कमबॅक

बुधवार (१३ नोव्हेंबर) पासून बंगाल आणि मध्यप्रदेश या दोन्ही संघांमध्ये एलीट ग्रुप सी चा सामना रंगणार आहे. या सामन्यातून मोहम्मद शमी कमबॅक करणार आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनने आपल्या प्रेस रिलीझमध्ये म्हटले की, ' ही भारतीय क्रिकेटसाठी आणि बंगाल रणजी संघासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे.

तो बुधवारपासून सुरु होणाऱ्या मध्यप्रदेशविरुद्धच्या सामन्यातून कमबॅक करणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आपला शेवटचा सामना खेळणारा शमी आता मध्यप्रदेशविरुद्धच्या सामन्यात वेगवान गोलंदाजी आक्रमणाचं नेतृत्व करताना दिसेल.'

तसेच आपल्या प्रेस रिलीजमध्ये त्यांनी पुढे लिहिले की, 'बंगाल संघात शमीचा समावेश होणं हे नक्कीच फायदेशीर आहे. बंगालचा संघ दुसऱ्या फेरीत स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.'

रणजी ट्रॉफीसाठी बंगालच्या संघात स्थान मिळणं हे मोहम्मज शमीसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. कारण शमी गेल्या वर्षभरापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. त्यामुळे त्याला आपली फिटनेस सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे.

जर त्याने रणजी ट्रॉफीतील पुढील २ सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली, तर त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या शेवटच्या ३ सामन्यांसाठी भारतीय संघात स्थान दिले जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

SCROLL FOR NEXT