ऑस्ट्रेलियात वुमेन्स बिग बॅश लीग स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेतील मंगळवारी (२९ ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात अॅडिलेड स्ट्रायकर्स आणि सिडनी सिक्सर्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते.
या सामन्यात अॅडिलेड स्ट्रायकर्स संघाचं क्षेत्ररत्रक्षण सुरु असताना, यष्टीरक्षकाने एक मोठी चूक केली. जी तिला चांगलीच महागात पडली आहे. यष्टीरक्षण करत असताना चेंडू तिच्या डोळ्यांना जाऊन लागला.
या चुकीमुळे तिला मैदान सोडावं लागलं. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
यष्टीरक्षण करताना एक चूक महागात पडू शकते. अशीची काहीसी चूक अॅडिलेड स्ट्रायकर्सची यष्टीरक्षक ब्रिजेट पेटरसनने केली. गोलंदाजाने चेंडू टाकल्यानंतर फलंदाजाला तो चेंडू हिट करता आला नाही.
त्यावेळी चेंडू अडवण्यासाठी ती गुडघ्यावर बसली. या प्रयत्नात चेंडू टप्पा घेऊन तिच्या डोळ्याला जाऊन लागला. चेंडू लागताच ती डोळ्याला हात लावून मैदानावरच झोपली. त्यानंतर फिजियोंना मैदानात यावं लागलं. चेंडू जोरदार लागला असल्यामुळे फिजियोंनी तिला मैदान सोडण्याचा सल्ला दिला.
हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. काहींचं म्हणणं आहे की, ही घटना खूपच वेदनादायक होती. तर काहींनी तिला लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात फलंदाजी करताना ब्रिजेट पॅटरसनने शानदार फलंदाजी केली. ब्रिजेट पॅटरसन फलंदाजी करताना ३२ चेंडूंचा सामना करत ४४ धावांची शानदार खेळी केली.
या खेळीदरम्यान तिने ६ चौकार आणि १ षटकार खेचला. तिच्या या शानदार खेळीच्या बळावर अॅडिलेड स्ट्रायकर्स संघाने २० षटकअखेर १७१ धावांपर्यंत मजल मारली.
सिडनी सिक्सर्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १७२ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सिडनी सिक्सर्सला २० षटकअखेर ९ गडी बाद १६० धावा करता आल्या. हा सामना अॅडिलेड स्ट्रायकर्सने ११ धावांनी आपल्या नावावर केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.