एमएम धोनी हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कर्णधांरापैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने २००७ टी-२० वर्ल्डकप, २०११ वनडे वर्ल्डकप आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजय मिळवला आहे. १५ ऑगस्ट २०२० रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. आता निवृत्त होऊन तीन वर्ष झाल्यानंतर बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे.
धोनी आपल्या आक्रमक फलंदाजी,नेतृ्त्व आणि यष्टीरक्षणासह आपल्या ७ नंबरच्या जर्सीमुळे देखील प्रसिद्ध आहे. इंडियन एक्स्प्रेस आणि एनडीटीव्हीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार,बीसीसीआयने ७ नंबरची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. (MS Dhoni Jersey Number Retired)
त्यांनी आपल्या खेळाडूंना स्पष्ट सांगितलं आहे की, भारतीय संघाकडून खेळत असताना ७ नंबरची जर्सी घालून खेळता येणार नाही.या वृत्तात असं म्हटलं गेलं आहे की, धोनीची जर्सी निवृ्त्त करण्यात आली आहे. (Latest sports updates)
सचिनच्या जर्सीबाबतही घेतला होता निर्णय..
खेळाडूंची जर्सी निवृत्त करणं हे बीसीसीआयसाठी नवीन नाही. यापूर्वी देखील बीसीसीआयने सचिन तेंडुलकरची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला होता. सचिन तेंडुलकर १० नंबरची जर्सी मैदानावर उतरायचा.
भारतीय संघात पदार्पण केल्यानंतर शार्दुल ठाकुर १० नंबरची जर्सी घालून मैदानावर उतरायचा मात्र बीसीसीआयने या विषयावर चर्चा केली आणि शार्दुल ठाकुरला आपला जर्सी नंबर बदलायला सांगितलं. त्यानंतर सचिनचा जर्सी नंबर निवृत्त करण्यात आला.
अशी आहे धोनीची कारकिर्द..
एमएस धोनीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर,त्याने भारतीय संघासाठी ९० कसोटी सामने खेळले. यादरम्यान त्याने ४८७६ धावा केल्या. ज्यात ६ शतकं आणि ३३ अर्धशतकांचा समावेश होता. तर ३५० वनडे सामन्यांमध्ये त्याने १०७७३ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने १० शतकं आणि ७३ अर्धशतकं झळकावली होती. तर ९८ टी-२० सामन्यांमध्ये त्याने १६१७ धावा केल्या. यादरम्यान त्याने २४ अर्धशतकं झळकावली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.