MS Dhoni New Hairstyle: धोनी परतला २००७ च्या लुकमध्ये; थालाच्या नव्या लुकचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

MS Dhoni New Look: एमएस धोनीच्या नव्या लुकचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Ms dhoni back in 2007 look new hairstyle video went viral on social media
Ms dhoni back in 2007 look new hairstyle video went viral on social media Twitter
Published On

MS Dhoni New Hairstyle:

भारतीय संघाचा कर्णधार एमएस धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केला असला तरीदेखील त्याची लोकप्रियता काही कमी झालेली नाही.

त्याची फॉलोविंग दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. नुकताच त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

एमएम आपल्या खेळासह आपल्या हटके हेअरस्टाईलमुळे देखील चर्चेत असतो. २००७ टी-२० वर्ल्डकप मध्ये एमएस धोनी लाँग हेअर लुकमध्ये दिसून आला होता. या हेअरस्टाईलचा क्रेझ त्यावेळी वेगळ्याच लेव्हलला होता. त्यानंतर २०११ वर्ल्डकपनंतर धोनीने सर्व केस कापले होते. आता तो एका हटके हेअरस्टाईलमध्ये दिसून आला आहे.

Ms dhoni back in 2007 look new hairstyle video went viral on social media
Asian Games 2023: कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा! स्वप्निल कुसाळेला सुवर्णपदक

आयपीएल २०२४ स्पर्धेत दिसणार नव्या लुकमध्ये..

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की,एमएस धोनी व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाताना दिसून येत आहे. यावेळी धोनी पू्न्हा एकदा लाँग हेअर लुकमध्ये दिसून आला आहे. धोनीने आपले केस बांधले आहेत.

त्याचा लुक पाहुन नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे. त्याचा हा लुक पाहून असं म्हटलं जात आहे की, एमएम धोनी आगामी आयपीएल २०२३ स्पर्धेत लाँग हेअर लुकमध्ये दिसून येऊ शकतो. (Latest sports updates)

Ms dhoni back in 2007 look new hairstyle video went viral on social media
Asian Games 2023: एशियन गेम्समध्ये २०० पदकांसह चीन अव्वल ; पदकांच्या यादीत भारत कितव्या स्थानी? इथे पाहा

अशी राहिलीये कारकिर्द..

एमएस धोनीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ९० कसोटी सामन्यांमध्ये ६ शतके आणि ३३ अर्धशतकांसह ४८७६ धावा केल्या आहेत. कर ३५० वनडे सामन्यांमध्ये त्याने ५०.६ च्या सरासरीने फलंदाजी करताना १० शतके आणि ७३ अर्धशतकांसह १२३०३ धावा केल्या आहेत. तर त्याच्या टी-२० क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर ९८ सामन्यांमध्ये ३८.८ च्या सरसरीने १२८२ धावा केल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com