Asian Games 2023: एशियन गेम्समध्ये २०० पदकांसह चीन अव्वल ; पदकांच्या यादीत भारत कितव्या स्थानी? इथे पाहा

Asian Games 2023 Medals Tally: पाहा भारत कितव्या स्थानी आहे.
Asian games 2023 updated medals tally india medals in asain games
Asian games 2023 updated medals tally india medals in asain gamesSaam tv news
Published On

Asian Games 2023 Medals Tally:

चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत ३३ पदकं मिळवली आहेत. ज्यात ८ सुवर्ण, १३ रौप्य आणि १३ कांस्य पदकांचा समावेश आहे. पदकांच्या यादी बद्दल बोलायचं झालं तर, भारत ३४ पदकांसह भारत चौथ्या स्थानी आहे.

Asian games 2023 updated medals tally india medals in asain games
Asian Games 2023: महिला नेमबाजांचा सुवर्णवेध सुरूच! १० मीटर पिस्तूल स्पर्धेत पलकला गोल्ड तर ईशाला सिल्वर मेडल

तर २०० पदकांसह चीन अव्वल स्थानी आहे. जपानने आतापर्यंत ९९ पदकांची कमाई केली आहे. तर दक्षिण कोरीयाने १०२ आणि भारताने ३३ पदकांची कमाई केली आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकांची यादी (अपडेटेड)

चीन - एकुण पदकं २०० (१०५ सुवर्णपदकं, ६३ रौप्यपदकं, ३२ कांस्यपदकं

दक्षिण कोरीया - एकुण पदकं १०२ (२६ सुवर्णपदकं, २८ रौप्य, ४८ कांस्यपदकं)

जपान- एकुण पदकं ९९ (२७ सुवर्णपदकं, ३५ रौप्यपदकं, ३७ कांस्यपदकं)

भारत- एकुण पदकं ३४ (८ सुवर्णपदकं, १३ रौप्यपदकं, १३ कांस्यपदकं) (Latest sports updates)

भारताच्या पदकांच्या यादीत आणखी भर पडणार आहे. कारण महिलांच्या ५० किलो ग्रॅम वजनी गटात निखत जरीनने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर पुरूषांच्या स्क्वॅश संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे रौप्यपदक निश्चित झालं आहे. आता भारतीय खेळाडू सुवर्णपदक जिंकण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.

Asian games 2023 updated medals tally india medals in asain games
Asian Games 2023: साकेथ मायनेनी,रामकुमार रामनाथन जोडीची कमाल;टेनिस डबल्समध्ये भारताला रौप्यपदक

भारतीय संघाला बॅडमिंटनच्या क्वार्टर फायनलमध्ये थायलंडकडून ३-० ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर पुरूषांच्या चालण्याच्या स्पर्धेत विकास सिंग पाचव्या स्थानी पोहोचला. त्यामुळे त्याचं पदक जिंकण्याचं स्वप्न हुकलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com