MS Dhoni: IPL 2024 साठी धोनी सज्ज!जिममधील स्टायलिश फोटो व्हायरल

MS Dhoni Fitness: आगामी हंगामातही एमएस धोनी चेन्नई सुपर किंग्ज संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे.दरम्यान त्याने या स्पर्धेसाठी जोरदार सराव करायला सुरुवात केली आहे
MS-Dhoni
MS-Dhonitwitter
Published On

MS Dhoni Latest News In Marathi:

आयपीएल २०२४ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या १९ डिसेंबर रोजी या स्पर्धेसाठी ऑक्शन पार पडणार आहे. या हंगामातही एमएस धोनी चेन्नई सुपर किंग्ज संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे.दरम्यान त्याने या स्पर्धेसाठी जोरदार सराव करायला सुरुवात केली आहे. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. (MS Dhoni Fitness)

आयपीएल २०२३ स्पर्धेच्या फायनलवेळी असं म्हटलं जात होतं की, हा धोनीचा शेवटचा हंगाम असू शकतो. मात्र फायनल झाल्यानंतर त्याने आगामी हंगामातही खेळणार असल्याचं सांगितलं होतं. आयपीएल २०२४ स्पर्धेची तारीख अजून ठरलेली नाही. दरम्यान धोनीने आतापासूनच सराव करायला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर त्याचा जिममध्ये सराव करत असल्याचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो एकदम फिट अँड फाईन असल्याचं दिसून येत आहे. (Latest sports updates)

MS-Dhoni
IND vs AUS: शेवटच्या षटकापूर्वी सूर्याने काय मेसेज दिलेला? सामना जिंकल्यानंतर अर्शदीपने केला खुलासा

चेन्नईने या खेळाडूंना केलं रिलीज...

चेन्नईचा संघ पुन्हा एकदा जेतेपद मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. या हंगामातही एमएस धोनी चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. आगामी आयपीएल हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाने रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

चेन्नईने आकाश सिंग, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, भगत वर्मा, ड्वेन प्रिटोरियस, काईल जेमिसन, सिसांडा मगाला, सुभ्रांशू सेनापती यांना रिलीज केलं आहे.

तर अंजिक्य रहाणे, दिपक चहर, डेवोन कॉनवे, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड सारखे स्टार खेळाडू या हंगामातही आपला जलवा दाखवताना दिसून येणार आहे. आगामी आयपीएल स्पर्धेसाठीचा लिलाव सोहळा १९ डिसेंबर रोजी दुबईत रंगणार आहे.

MS-Dhoni
IND vs AUS: ऋतुराजचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठा कारनामा! असा रेकॉर्ड करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com