rishabh pant  saam tv
Sports

टीम इंडियाला चौथ्या कसोटीआधी मोठा धक्का? पराभवानंतर कॅप्टन शुभमन गिलनं रिषभ पंतबाबत दिली मोठी अपडेट

Rishabh Pant injury Update : तिसऱ्या कसोटीत इंग्लंडकडून पराभव झाल्यानंतर चौथ्या कसोटीत दुखापतग्रस्त विकेटकीपर रिषभ पंत खेळणार की नाही याबाबत अजूनही संभ्रम आहे. कर्णधार शुभमन गिल यानं याबाबत मोठी अपडेट दिली आहे.

Nandkumar Joshi

Shubman Gill latest update on Rishabh Pant injury : लॉर्ड्सवर झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला झुंजवणाऱ्या टीम इंडियाचा अवघ्या २२ धावांनी पराभव झाला. अवघ्या १९३ धावांचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव १७० धावांवर आटोपला. भारताचा पराभव झाल्यानं इंग्लंडनं पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. आता पुढच्या म्हणजेच चौथ्या कसोटी सामन्यात भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल, असा प्रश्न आहे. जसप्रीत बुमराह खेळणार आहे की नाही? करूण नायरचं काय होणार ? असे प्रश्न आहेतच, त्याचसोबत दुखापतग्रस्त रिषभ पंत चौथ्या कसोटीत मैदानात उतरणार आहे की नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. त्याबाबत स्वतः शुभमन गिल यानं माहिती दिली आहे.

शुभमन गिल नेमका काय म्हणाला? Rishabh Pant Fitness Update Before Manchester Test

लॉर्ड्सच्या मैदानात भारताचा पराभव झाल्यानंतर शुभमन गिल यानं पत्रकार परिषद घेतली. यात त्याला रिषभ पंतच्या फिटनेसबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शुभमन गिलनं पंतच्या दुखापतीबाबत महत्वाची अपडेट दिली. पंतला स्कॅनसाठी नेण्यात आले होते. त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. तो पुढच्या कसोटी सामन्यापर्यंत फिट होईल.

लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्याच डावात त्याला दुखापत झाली होती. बुमराहचा चेंडू अडवताना त्याच्या हाताला दुखापत झाली होती. तरीही पहिल्या डावात त्यानं झुंजार फलंदाजी करून ७४ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात त्याने अवघ्या ९ धावा केल्या. टीम इंडियाला अखेर पराभवाचा सामना करावा लागला होता.

पंत फिट होणार? India vs England 4th Test Will Injured Rishabh Pant Be Fit?

भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना २३ जुलैपासून मँचेस्टर येथे सुरू होणार आहे. हा अत्यंत महत्वाचा सामना असणार आहे. त्याआधी रिषभ पंत तंदुरुस्त होणे गरजेचे आहे. कारण तो सध्या फॉर्मात आहे. पंतने ३ सामन्यांत ७० हून अधिकच्या सरासरीने ४२५ धावा केल्या आहेत. या मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक १५ षटकार लगावले आहेत. पंत जर मँचेस्टर कसोटीत खेळला नाही तर, स्वाभिवकच संघाचं नुकसान होणार आहे. मँचेस्टर कसोटीला अद्याप काही दिवस आहेत, त्यामुळे पंत दुखापतीतून सावरेल अशी अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : कापसाच्या सघन लागवडीचा 'अकोला पॅटर्न'; 'सघन' पद्धत आणि पारंपारिक पद्धतमधील फरक काय?

Maharashtra Politics: राजकारणात नवा ट्विस्ट: उद्धव-राज युतीवर सस्पेन्स कायम, शिंदेंची नजर

Ramdas Athawale: महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही; मराठीच्या मुद्द्यावरून रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना ठणकावलं

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांची भाजपमध्ये एन्ट्री

कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामायणाचं सादरीकरण; ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दुमदुमला पाकिस्तान

SCROLL FOR NEXT