
Ind Vs Eng : भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल इंग्लंड दौऱ्यावर चमकला आहे. त्याने दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये शानदार खेळ केला आहे. लीड्स आणि एजबॅस्टन कसोटीत मिळून कॅप्टन गिलने ५८५ धावा केल्या आहेत. दुसऱ्या सामन्यात त्याने २६९ अशी विक्रमी खेळी केली होती. कामगिरी करुनही भारताचा कर्णधार वादात अडकला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने केलेल्या एका कृत्याच्या फटका बीसीसीआयला सहन करावा लागू शकतो, असे म्हटले जात आहे.
शुभमन गिलची 'ती' चूक
भारताने दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी शुभमन गिल डाव घोषित करण्यासाठी आला, त्यावेळेस त्याने काळ्या रंगाचा टीशर्ट घातला होता. या टीशर्टवर Nike ब्रँडचा लोगो होता. गिल Nike चा टीशर्ट घालून कॅमेऱ्यासमोर आला होता. सध्या टीम इंडियाचा Adidas कंपनीशी करार आहे. BCCI आणि Adidas यांचा २०२८ पर्यंत करार आहे.
गिलमुळे बीसीसीआयचे करोडोंचे नुकसान होणार?
Adidas ही बीसीसीआयची स्पॉन्सर कंपनी आहे. बीसीसीआयच्या जर्सीवर Adidas चा लोगो आहे. संघातील प्रत्येक खेळाडूने स्पॉन्सर कंपनीचा लोगो असलेली जर्सी घालणे आवश्यक आहे. हा नियम टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूला लागू होतो. पण संघाच्या कर्णधाराने, शुभमन गिलने हा नियम मोडला आहे. याबद्दल Adidas कंपनी कारवाई करु शकते, कंपनी करार रद्द देखील करु शकते. यामुळे बीसीसीआयला कोट्यवधींचे नुकसान होण्याचीही शक्यता आहे.
शुभमन गिलची कामगिरी
लीड्सच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात शुभमन गिलने १४७ धावा केल्या. एजबॅस्टन कसोटी सामन्याच्या पहिल्या डावामध्ये त्याने २६९ धावा करत इतिहास रचला, दुसऱ्या डावामध्ये गिलने १६१ धावा करुन कठीण परिस्थितीतून भारताला बाहेर काढले. ही अशी शानदार कामगिरी केल्यानंतरही फक्त एका चुकीमुळे गिल आणि बीसीसीआय अडचणीत सापडू शकतात अशा चर्चा सुरु आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.