
Pant overtakes Viv Richards to become sixer king vs England : कसोटी क्रिकेटमधील महारथी असलेल्या भारत आणि इंग्लंड या दोन संघांत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर सुरू आहे. भारतीय गोलंदाजांनी जादूई कमाल दाखवल्यानंतर आता फलंदाजांनीही आक्रमकपणा दाखवत इंग्लंडला त्यांच्यात मैदानावर जेरीस आणलं आहे. राहुल द्रविडनं तर मैदानावर ठिय्याच मांडला आहे. तर उपकर्णधार ऋषभ पंतनं लॉर्ड्सवर इतिहास रचला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडला नडणारा फलंदाज म्हणून त्यानं स्वतःला पुन्हा सिद्ध केलंय. इग्लंडविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारा तो अव्वल फलंदाज ठरला आहे.
इंग्लंडविरुद्ध ऋषभ पंत यानं ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर इतिहास रचलाय. कसोटी क्रिकेटमध्ये सिक्सर किंग म्हणून ऋषभ नावारुपाला आलाय. इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीला फोडून काढत या संघाविरोधात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम त्यानं आपल्या नावावर केला आहे.
आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, पंतने इंग्लंडविरुद्ध कसोटीमध्ये ३५ षटकार लगावले आहेत. वेस्ट इंडीजचा महान क्रिकेटपटू सर विव रिचर्ड्स यांना त्यानं मागं टाकलं आहे. त्यांनी इंग्लंडविरुद्ध ३४ षटकार लगावले आहेत. कमालीचा आक्रमकपणा आणि नीडर फलंदाजी यामुळंच हा विक्रम करणं त्याला शक्य झालंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
ऋषभ पंत - ३५ षटकार
विव रिचर्ड्स - ३४
टिम साउदी- ३०
यशस्वी जयस्वाल - २७
शुभमन गिल- २६
या यादीत ऋषभ पंतसह भारताचे आणखी दोन फलंदाज आहेत. यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल हे दोन्हीही युवा फलंदाज आहेत. या दोघांनी सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत तुफान फलंदाजी करत इंग्लंडचं वर्चस्व मोडून काढलंय. जयस्वालनं आताच करिअरची सुरुवात केली आहे. पण त्यानं इंग्लंडविरुद्धच्या कसोटी कारकिर्दीत २७ षटकार खेचले आहेत. आगामी काळात तो या यादीत अव्वल स्थानी जाऊ शकतो, असा अंदाज आहे. दुसरीकडं शुभमन गिल देखील अव्वल पाच फलंदाजांमध्ये आहे.
शुभमन गिल, ऋषभ पंत, केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, करुण नायर, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंडची प्लेइंग ११
बेन स्टोक्स, जॅक क्रॉली, ओली पोप, बेन डकेट, हॅरी ब्रुक, क्रिस वोक्स, जेमी स्मिथ, ब्रायडन कार्स, शोएब बशीर, जोफ्रा आर्चर आणि जो रूट.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.