Virat Kohli : कसोटीतून निवृत्ती का घेतली? विराट कोहलीनं विचित्र कारण सांगितलं, म्हणाला, जेव्हा ४ दिवसांत दाढी...

Virat Kohli Test Retairement : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रनमशीन विराट कोहलीनं पहिल्यांदाच त्यामागचं कारण सांगितलं. आताच दोन दिवसांपूर्वी मी दाढी काळी केलीय, असं सांगतानाच वाढत्या वयामुळं निवृत्तीचा निर्णय घ्यावा लागला, असं त्यानं स्मितहास्य करत सांगितलं.
Virat Kohli : विराट कोहलीनं कसोटी निवृत्तीनंतर पहिल्यांदाच या निर्णयामागचं कारण सांगितलंय.
Virat Kohli : विराट कोहलीनं कसोटी निवृत्तीनंतर पहिल्यांदाच या निर्णयामागचं कारण सांगितलंय. Saam tv
Published On

Virat Kohli First time opens up on Test Retairement : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यानं कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केल्यानंतर काही दिवसांनीच रनमशीन विराट कोहली यानंही संन्यास घेत असल्याची घोषणा केली. भारतीय क्रिकेट आणि क्रिकेट चाहत्यांना हा दुहेरी धक्का होता. या दोघांनीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली, असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे. मात्र, विराट कोहलीनं त्याच्या निवृत्तीच्या निर्णयामागचं कारण सांगितलं आहे.

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग यानं आयोजित केलेल्या स्पेशल गाला डिनरमध्ये विराट कोहलीनं निवृत्तीच्या निर्णयानंतर क्रिकेट विश्वात उडालेल्या अफवांवर पहिल्यांदाच मौन सोडलं. आता दोन दिवसांपूर्वीच मी माझ्या दाढीचा रंग काळा केला आहे. चार दिवसांनी तुम्हाला दाढीचा रंग काळा करायला लागतो याचा अर्थ आता वेळ आली आहे, असं तो म्हणाला.

युवराज सिंगनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर ख्रिस गेल, केविन पीटरसन आणि रवी शास्त्री देखील उपस्थित होते. विराट कोहली हा सुरुवातीला मंचावर नव्हता. तो बऱ्याच वेळानं मंचावर गेला. मीट अँड ग्रीट या सेगमेंटमध्ये कोहली सहभागी झाला. होस्ट गौरव कपूर यानं विराट कोहलीला थेट कसोटी निवृत्तीबाबत विचारणा केली.

त्यावर कोहलीनं सुरुवातीला स्मितहास्य केलं. मी दोन दिवसांपूर्वीच दाढी काळी केली आहे. जेव्हा तुम्हाला चार दिवसांनी दाढी काळी करायला लागते तेव्हा लक्षात येतं की आता वेळ आली आहे, असं म्हणून त्यानं निवृत्तीमागचं कारण सांगितलं. यावेळी विराटनं रवी शास्त्रीचंही कौतुक केले. जर शास्त्री यांचा पाठिंबा नसता तर माझी कसोटी कारकिर्द आता आहे तशीच त्यावेळी असती, असंही तो म्हणाला.

विराट कोहली म्हणाला की, 'प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर, रवी शास्त्रींसोबत नसतो तर माझ्यासोबत कसोटी क्रिकेटमध्ये जे घडलं ते कदापि झालं नसतं. ज्या प्रकारे रवी शास्त्रींनी पत्रकार परिषदेत मला पाठिंबा दर्शवला, तसं घडलेलं खूप कमी बघायला मिळतं. ते या माझ्या प्रवासातील अत्यंत महत्वाचा भाग आहेत.'

Virat Kohli : विराट कोहलीनं कसोटी निवृत्तीनंतर पहिल्यांदाच या निर्णयामागचं कारण सांगितलंय.
Ind Vs Eng सामन्यानंतर आकाश दीपला अश्रू अनावर, कॅन्सरग्रस्त बहिणीला समर्पित केला विजय

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा होण्याआधी कोहलीनं निवृत्ती जाहीर केली. विराट कोहलीनं १२ मे २०२५ रोजी निवृत्तीची घोषणा केली. याआधी त्यानं टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाही रामराम ठोकलं होतं. कसोटीमध्ये तो फॉर्मशी झुंज देत होता. हवी तशी कामगिरी त्याच्याकडून झाली नव्हती. बॉर्डर - गावसकर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो अखेरचा कसोटी सामना खेळला होता.

या स्पर्धेनंतर त्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून जोरदार कमबॅक केलं होतं. रणजी ट्रॉफीमध्येही तो खेळला होता. तिथेही त्याला फारसं यश मिळालं नाही. कोहलीच्या आधी रोहित शर्मा यानंही ७ मे रोजी कसोटीमधून निवृत्ती घोषित केली होती. आता रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही धुरंदर टीम इंडियाच्या वनडे संघातून खेळताना दिसणार आहेत.

Virat Kohli : विराट कोहलीनं कसोटी निवृत्तीनंतर पहिल्यांदाच या निर्णयामागचं कारण सांगितलंय.
England Playing XI : भारताविरोधात तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, 'धारदार' गोलंदाजाची एन्ट्री

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com