Indian cricket team twitter
क्रीडा

IND vs AFG, Super 8: टीम इंडियाला मोठा धक्का! सुपर 8 आधीच प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील साखळी फेरीतील सामन्यांमध्ये भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. आता भारतीय संघ साखळी फेरीतील सामने खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा सामना २० जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय खेळाडू कसून सराव करताना दिसून येत आहेत. दरम्यान या सामन्यापू्र्वीच भारतीय संघाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे.

सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त

भारतीय संघाचा पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी,सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त झाल्याची बातमी समोर येत आहे. माध्यमातील वृत्तानुसार,थ्रो डाऊनवर फलंदाजीचा सराव करत असताना चेंडू त्याच्या उजव्या हाताच्या बोटाला जाऊन लागला. त्यामुळे त्याला सराव थांबवावा लागला. त्यानंतर स्प्रे मारुन तो पुन्हा एकदा फलंदाजी करण्यासाठी आला.

सूर्यकुमार यादवला झालेली दुखापत ही फार गंभीर नाही, त्यामुळे ही भारतीय संघाला दिलासा देणारी बाब आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादवकडून भारतीय संघाला मोठ्या आशा आहेत. मात्र त्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. सूर्यकुमार यादव टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी आहे.

त्याचा या स्पर्धेतील रेकॉर्ड पाहिला, तर त्याला ३ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याला अवघ्या ५९ धावा करता आल्या आहेत. साखळी फेरीत सूर्याची बॅट शांत होती. मात्र भारतीय संघाला जर टी-२० वर्ल्डकप जिंकायचा असेल, तर सूर्यकुमार यावदची बॅट तळपणं अतिशय गरजेचं असणार आहे.

कधी होणार भारतीय संघाचे सामने?

भारतीय संघाला टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेच्या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत. यादरम्यान ३ सामने जिंकले आहेत. तर १ सामना हा पावसामुळे रद्द झाला होता. सुपर ८ मध्ये भारतीय संघाचा पहिला सामना हा २० जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा सामना २२ जून रोजी बांगलादेश आणि २४ जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Subhadra Yojana: महिलांना मिळणार १०,००० रुपये; काय आहे सुभद्रा योजना?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

iPhone 16 Sale Video : iPhone 16 च्या खरेदीसाठी अॅपल स्टोअर बाहेर झुंबड; बघा Video

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT