Nicholas Pooran, WI vs AFG: पूरनच्या वादळात अफगाण गोलंदाजांची धुळधाण! एकाच षटकात चोपल्या 36 धावा; पाहा VIDEO

Nicholas Pooran 36 Runs In Over: निकोलस पूरनने अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात ३६ धावा चोपल्या आहेत.
Nicholas Pooran, WI vs AFG: पूरनच्या वादळात अफगाण गोलंदाजांची धुळधाण! एकाच षटकात चोपल्या 36 धावा; पाहा VIDEO
nicholas pooraninstagram
Published On

यजमान वेस्टइंडिज आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेतील ४० वा सामना पार पडला. या सामन्यात नाणेफेक गमावून फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्टइंडिज संघाने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची चांगली धुलाई केली. तुफान फटकेबाजी करत वेस्टइंडिजने २० षटकअखेर २१८ धावांचा डोंगर उभारला. वेस्टइंडिजकडून फलंदाजी करताना निकोलस पुरन चमकला. त्याने ९८ धावांची वादळी खेळी केली. यासह वेस्टइंडिज संघाच्या नावे काही मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

वेस्टइंडिजचे फलंदाज पावरप्लेच्या षटकांमध्ये गोलंदाजांवर तुटून पडले. या संघाने पावरप्लेच्या ६ षटकात ९२ धावा चोपल्या. ही कुठल्याही संघाने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड नेदरलँडच्या नावावर होता. नेदरलँडने २०१४ मध्ये आयर्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात सुरुवातीच्या ६ षटकात ९१ धावा चोपल्या होत्या.

Nicholas Pooran, WI vs AFG: पूरनच्या वादळात अफगाण गोलंदाजांची धुळधाण! एकाच षटकात चोपल्या 36 धावा; पाहा VIDEO
Team India News: सुपर ८ मध्ये टीम इंडियाची प्लेइंग ११ बदलणार; रोहित या दोघांपैकी एकाला दाखवणार बाहेरचा रस्ता

टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पावरप्लेमध्ये सर्वात मोठी धावसंख्या उभारणारे संघ

१०२ धावा - दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्टइंडिज, सेंचुरियन, २०२३

९८ धावा - वेस्टइंडिज विरुद्ध श्रीलंका, कूलिज, २०२१

९३ धावा - आयर्लंड विरुद्ध वेस्टइंडिज, सेंट जॉर्ज, २०२०

९२ धावा - वेस्ट इंडिजविरुद्ध अफगाणिस्तान , ग्रोस आइलेट, २०२४

Nicholas Pooran, WI vs AFG: पूरनच्या वादळात अफगाण गोलंदाजांची धुळधाण! एकाच षटकात चोपल्या 36 धावा; पाहा VIDEO
IND vs AFG, Super 8: भारत- अफगाणिस्तानमध्ये रंगणार सुपर ८ चा थरार! कुठे अन् केव्हा पाहता येणार?

निकोलस पूरनचं वादळ

निकोलस पूरनने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने मैदानाच्या चारही बाजूंना फटके खेळत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. त्याच्याकडे आपलं शतक साजरं करण्याची संधी होती. मात्र शतकापासून २ धावा दूर असताना तो बाद होऊन माघारी परतला. आपल्या खेळीदरम्यान त्याने ६ चौकार आणि ८ षटकार मारले. या सामन्यातील चौथ्या षटकात त्याने अतिरिक्त धावा घेत ३६ धावा जोडल्या. यासह त्याने सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत युवराज सिंग आणि कायरन पोलार्डची बरोबरी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com