WI vs NZ, Highlights: यजमान वेस्टइंडिजचा न्यूझीलंडला दे धक्का! विजयाची हॅट्ट्रिक करत मिळवलं सुपर ८ मध्ये स्थान

West Indies vs New Zealand Match Highlights: वेस्टइंडिज विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात वेस्टइंडिजने शानदार कामगिरी करत विजय मिळवला आहे.
WI vs NZ, Highlights: यजमान वेस्टइंडिजचा न्यूझीलंडला दे धक्का! विजयाची हॅट्ट्रिक करत मिळवलं सुपर ८ मध्ये स्थान
west indies cricket teamtwitter

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत आणखी एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. स्पर्धेतील २६ व्या सामन्यात वेस्टइंडिज आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात वेस्टइंडिजने न्यूझीलंडचा धुव्वा उडवत सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. वेस्टइंडिजला हा सामना जिंकून देण्यात शेरफेन रुदरफोर्डने मोलाची भूमिका बजावली आहे. वेस्टइंडिजकडून प्रथम फलंदाजी करताना त्याने ६ षटकारांच्या मदतीने ६८ धावांची तुफानी खेळी केली. (WI vs NZ Highlights)

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अवघ्या ३० धावांवर वेस्टइंडिजच्या ५ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. मात्र शेरफेन रुदरफोर्डने तुफान फटकेबाजी करत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवलं. वेस्टइंडिजने २० षटकअखेर ९ गडी बाद १४९ धावा केल्या.

WI vs NZ, Highlights: यजमान वेस्टइंडिजचा न्यूझीलंडला दे धक्का! विजयाची हॅट्ट्रिक करत मिळवलं सुपर ८ मध्ये स्थान
IND vs USA T20 World Cup: अमेरिकेला नमवत टीम इंडियाची सुपर ८ मध्ये धडक, ७ विकेट राखून दणदणीत विजय

न्यूझीलंडला हा सामना जिंकण्यासाठी १५० धावा करायच्या होत्या. हे आव्हान तसं मोठं नव्हतं. मात्र या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. फिन अॅलेन आणि डेव्होन कॉनव्हेने २० धावांची भागीदारी केली. कॉनव्हे ५ धावा करत माघारी परतला. त्यानंतर फिन अॅलेनने देखील ३ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने २६ धावा करत पॅव्हेलियनची वाट धरली. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक ४० धावांची खेळी केली. मात्र न्यूझीलंडचा संघ विजयापासून १३ धावा दूर राहिला.

WI vs NZ, Highlights: यजमान वेस्टइंडिजचा न्यूझीलंडला दे धक्का! विजयाची हॅट्ट्रिक करत मिळवलं सुपर ८ मध्ये स्थान
IND vs USA T20 World Cup: भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे अमेरिका भेदरली; टीम इंडियाला १११ धावांचे आव्हान

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून शेरफेन रुदरफोर्डने ३९ चेंडूंचा सामना करत नाबाद ६८ धावांची खेळी केली. तर निकोलस पुरनने १७ धावा केल्या आणि अकिल हुसेनने १५ धावा करत संघाची धावसंख्या १४९ धावांवर पोहोचवली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com