team india twitter
Sports

IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! फॉर्ममध्ये असलेला फलंदाज संपूर्ण मालिकेतून बाहेर

Nitish Kumar Reddy Ruled Out: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. ही मालिका सुरु असताना भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

Ankush Dhavre

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. ही मालिका सुरु असताना भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा युवा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी वर्ल्डकप विजेत्या संघातील अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे.

नेमकं कारण काय?

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी बीसीसीआयने प्रेस रिलीज शेअर करत नितीश रेड्डीच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट दिली आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार रेड्डी साईड स्ट्रेनच्या दुखण्याने त्रस्त आहे. त्यामुळे त्याला संपूर्ण मालिकेतून विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दुसऱ्या टी-२० पूर्वी झालेल्या सरावादरम्यान तो दुखापतग्रस्त झाला होता. नितीश कुमार रेड्डीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत शानदार कामगिरी केली होती. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आलं होतं. मात्र त्याला गोलंदाजी आणि फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती.

शिवम दुबेला मिळाली संधी

नितीश रेड्डी या मालिकेतून बाहेर पडताच त्याच्या जागी शिवम दुबेला भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. तो राजकोटच्या मैदानावर होणाऱ्या तिसऱ्या टी-२० सामन्यातून भारतीय संघासोबत जोडला जाणार आहे.

सध्या तो मुंबई संघाकडून रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळण्यात व्यस्त आहे. त्यामुळे तो थेट राजकोटला जाणार आहे. तर त्याची कामगिरी पाहिली, तर जम्मू आणि काश्मीरविरुद्ध झालेल्या सामन्यातील दोन्ही डावात तो शून्यावर बाद होऊन माघारी परतला.

वर्ल्डकप विजेत्या संघाचं केलंय प्रतिनिधित्व

यापूर्वी भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेची ट्रॉफी उंचावली होती. या स्पर्धेसाठी शिवम दुबेचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. त्याने गोलंदाजीसह फलंदाजीतही बहुमुल्य योगदान दिलं होतं.

त्यानंतर त्याला बांगलादेशविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेदरम्यान तो दुखापतग्रस्त झा ला होता. त्यानंतर सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतून त्याने कमबॅक केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुरतच्या उधना रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची दीड किलोमीटर लांब रांग

Viral Fever: दिवाळीनंतर वायरल तापाचा धोका वाढतो? जाणून घ्या कारण

Raigad Crime: सोशल मीडियावरच्या प्रेमासाठी तोडली सात वचनं; प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने काढला पतीचा काटा

Maharashtra Politics: निवडणुकीआधीच राजकारण तापलं, स्वबळाचा नारा, उदय सामंतांचा मित्रपक्षाला इशारा

Diwali Abhyang Snan Positivity: अभ्यंगस्नान करताना अंघोळीच्या पाण्यात टाका या वस्तू, शरीरात दिसतील चांगले बदल

SCROLL FOR NEXT