Big blow for mumbai indians hardik pandya fined 24 lakhs by bcci for breaching ipl code of conduct amd2000 twitter
क्रीडा

Hardik Pandya Fined: लाजिरवाण्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! हार्दिक पंड्यावर BCCI ने घेतली मोठी ॲक्शन

Hardik Pandya Fined By BCCI: या लाजिरवाण्या पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्यावर बीसीसीआयने मोठी कारवाई केली आहे.

Ankush Dhavre

लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर लखनऊ सुपरजायंट्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये स्पर्धेतील ४८ वा सामना पार पाडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या लाजिरवाण्या पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्यावर बीसीसीआयने मोठी कारवाई केली आहे.

नेमकं कारण काय?

लखनऊ सुपरजायंट्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला निर्धारीत वेळेत २० षटकं पूर्ण करता आले नाहीत. त्यामुळे हार्दिक पंड्यावर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा ही चूक केली आहे. त्यामुळे कर्णधार हार्दिक पंड्यावर २४ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. यासह प्लेइंग ११ (इम्पॅक्ट प्लेअरसह) मध्ये असलेल्या खेळाडूंवर ६ लाख किंवा मॅच फी च्या २५ टक्के दंड आकारण्यात आला आहे.

यापूर्वी पंजाब किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यातही हार्दिक पंड्याने ही चूक केली होती. त्यावेळी हार्दिक पंड्यावर १२ लाखांचा दंड आकारण्यात आला होता. आता दुसऱ्यांदा चूक केल्यामुळे हार्दिक पंड्यावर २४ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. यासह प्लेइंग ११ मध्ये असलेल्या खेळाडूंवर ६ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.

ही चूक त्याने तिसऱ्यांदा केल्यास त्याच्यावर ३० लाखांचा दंड आकारण्यात येईल. यासह त्याच्यावर १ सामन्याची बंदी देखील घातली जाईल. तसेच संघातील इतर खेळाडूंवर १२ लाखांचा दंड आकारला जाईल. त्यामुळे इथून पुढे हार्दिक पंड्याला सावध राहावं लागणार आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकअखेर १४४ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना लखनऊ सुपरजायंट्स संघांकडून मार्कस स्टोइनिसने शानदार कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajesh Pawar News : भाजप आमदाराची सभा गावकऱ्यांनी उधळली! राजेश पवार यांच्या सभेत गोंधळ | VIDEO

Sambhajinagar News : मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडे माहिती सादर न करणाऱ्या ३३ मुख्याध्यापकांचे निलंबन

Ashton Agar: वाघाचं काळीज लागतं! दुखापतग्रस्त असूनही पठ्ठ्या मैदानात आला अन् एका हाताने केली फलंदाजी -VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस बारामती विमानतळावर येणार

Pune Crime: पुणे जिल्ह्यात १२६७ गुन्हे दाखल; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT