team india pratika rawal injured saam tv
Sports

Ind vs Aus Semifinal : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमिफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का; स्टार फलंदाज संघाबाहेर

ICC women's world cup Semi final : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३० ऑक्टोबरला महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमिफायनलचा सामना होणार आहे. त्याआधीच भारतीय संघाला मोठा हादरा बसला आहे. सलामीवीर प्रतिका रावल वर्ल्डकपमधून बाहेर झाली आहे.

Nandkumar Joshi

  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार वर्ल्डकप सेमिफायनल

  • अत्यंत महत्वाच्या सामन्याआधी भारताला मोठा हादरा

  • स्टार क्रिकेटर प्रतिका रावल संघाबाहेर

  • बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात फिल्डिंग करताना झाली होती दुखापत

न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघाला पराभूत करून आयसीसी महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमिफायनलमध्ये पोहोचलेल्या भारतीय संघाला मोठा हादरा बसला आहे. भारतीय संघानं वनडे वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करून सेमिफायनलमध्ये स्थान पक्कं केलं आहे. वर्ल्डकपचं जेतेपद पटकावण्यापासून टीम इंडिया फक्त दोन सामने दूर आहे. मात्र, सेमिफायनलमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना होणार आहे. हा सामना जिंकून फायनलमध्ये पोहोचण्याच्या अपेक्षा उंचावल्या असतानाच भारताला मोठा धक्का बसला आहे. संघातील स्टार खेळाडू दुखापतीमुळं स्पर्धेबाहेर गेली आहे.

प्रतिका रावल वर्ल्डकपमधून बाहेर

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं न्यूझीलंडला पराभूत करून सेमिफायनलमध्ये धडक दिली. त्यानंतर सेमिफायनलच्या आधी बांगलादेशविरुद्ध साखळी फेरीतील एक सामना होता. पावसामुळे या सामन्याचा निकाल लागू शकला नाही. पण या सामन्यात भारताची सलामीवीर प्रतिका रावल दुखापतग्रस्त झाली.

या सामन्यात प्रतिका रावल ही बाउंड्रीजवळ फिल्डिंग करत होती. त्यावेळी तिला दुखापत झाली आणि ती मैदानाबाहेर गेली. प्रतिका पुढचा सामना खेळणार की नाही याबाबत शंका होती. मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिका संपूर्ण वर्ल्डकप स्पर्धेतूनच बाहेर झाली आहे. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध अत्यंत महत्वाच्या सेमिफायनलच्या सामन्याआधीच प्रतिका स्पर्धेबाहेर गेल्यानं टीम इंडियाला हा मोठा हादरा मानला जात आहे.

३० ऑक्टोबरला सेमिफायनल, ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढत

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात सेमिफायनलचा सामना होणार आहे. या सामन्यात प्रतिका रावल खेळू शकणार नाही. तिच्या घोट्याला दुखापत झाली आहे. ही दुखापत गंभीर असल्यानं ती स्पर्धेबाहेर झाली आहे. ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या संघाविरुद्ध ती खेळणार नसल्यानं हा टीम इंडियासाठी मोठा धक्का मानला जात आहे. स्कॅन केल्यानंतर प्रतिका रावलच्या घोट्याला झालेली दुखापत ही गंभीर आहे, हे स्पष्ट झालेले आहे. ती कोणत्याही परिस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना खेळू शकणार नाही, असे सांगितले जात आहे.

प्रतिका रावलने वर्षभरापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय. अत्यंत कमी कालावधीत तिनं चुणूक दाखवली आहे. २०२४ मध्येच तिनं पदार्पण केलं आहे. वनडेमध्ये सर्वात वेगवान १००० धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीतही ती आघाडीवर आहे. तर लवकरच एका वर्षात हजार धावा करणारी फलंदाज होण्याचा मानही तिला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: ठाकरे सेनेच्या सावकार नेत्याचा माज उतरवला; अपहरण प्रकरणी ठोकल्या बेड्या,नंतर काढली धिंड

Mumbai Accident : मुंबईत अपघाताचा थरार; छटपूजेहून परतणाऱ्या तरुणाचा मृत्यू

Asthma: अस्थमाची लक्षणे कोणती? अशी घ्या काळजी

Bihar Election : निवडणुकीआधी माजी उपमुख्यमंत्र्यांचा दणका; 27 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार? चाहत्यांमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT