Ind vs Aus T20 : टी-20 मालिकेआधीच टीम इंडियासाठी खूशखबर; ऑस्ट्रेलियाचा हुकमी एक्का संघाबाहेर

India Vs Australia 1st t 20 : भारतीय फलंदाजांना नडणारा फिरकीपटू एडम झम्पा हा भारताविरुद्धच्या पहिल्या टी २० सामन्यात खेळणार नाही. त्याच्या जागी तनवीर संघा याला संघात घेतलं आहे.
टी २० मालिकेआधी एडम झम्पा संघाबाहेर, ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का
india vs Australia t 20 matchsaam tv
Published On
Summary
  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी २० मालिका

  • कॅनबेरा येथे होणार पहिला टी २० सामना

  • ऑस्ट्रेलियाला मोठा झटका

  • एडम झम्पा पहिल्या टी २० तून बाहेर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका संपली आहे. ऑस्ट्रेलियानं २-१ ने मालिका जिंकली असली तरी, अखेरच्या सामन्यात भारताचा रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गज फलंदाजांच्या जोडीनं विजय मिळवून दिल्यानं क्लीन स्वीप टळला. आता बुधवार, २९ ऑक्टोबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया टी २० मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना कॅनबेरा येथे भारतीय वेळेनुसार दुपारी पावणे दोन वाजता होणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आली आहे.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची फलंदाजी भक्कम आहे. पण तळापर्यंत असलेली भारतीय फलंदाजी भेदण्याची ताकद असलेला ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू एडम झम्पा टी २० मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळणार नाही. यामागं वैयक्तिक कारण असल्याचं सांगितलं जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डानं त्याच्या जागी तनवीर संघा याला संघात संधी दिली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन दिग्गज संघांमध्ये पाच सामन्यांची टी २० मालिका होणार आहे. मालिकेतील पहिला सामना हा २९ ऑक्टोबरला कॅनबेरामध्ये होईल. ईएसपीएन क्रिक इन्फोच्या वृत्तानुसार, झम्पाच्या पत्नीने दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. त्यासाठी तो घरी रवाना झाला आहे. त्यामुळे तो पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही.

झम्पाच्या जागी २३ वर्षीय संघाला संधी दिली आहे. त्यानं ऑस्ट्रेलियासाठी ७ टी ट्वेंटी सामने खेळले आहेत. यात त्याने १० विकेट्स घेतल्या आहेत. बिग बॅश लिग (BBL) मध्ये सिडनी थंडरमध्ये खळणारा संघा हा २०२३ नंतर कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. त्यानं दक्षिण आफ्रिका या संघाविरुद्ध सर्वोत्तम आणि अविस्मरणीय कामगिरी केली होती. ३१ धावांच्या मोबदल्यात त्यानं चार विकेट्स घेतल्या होत्या.

टी २० मालिकेआधी एडम झम्पा संघाबाहेर, ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का
Rohit Sharma Record : रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियात रचला इतिहास; विराट, सचिन तेंडुलकरही मागे पडले

या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया अ संघ भारत दौऱ्यावर आला होता. या टीममध्ये संघाचा समावेश होता. त्याने भारत अ संघाविरोधात खेळताना तीन वनडे सामन्यात सात विकेट घेतल्या होत्या. तर झम्पा हा भारताच्या विरोधात पर्थमध्ये पहिल्या वनडे सामन्यात खेळला नव्हता. मात्र, त्यानंतरच्या दोन सामन्यांत तो खेळला होता.

टी २० मालिकेआधी एडम झम्पा संघाबाहेर, ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का
Virat Kohli : विराट कोहलीनं मोडला महान सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड; आश्चर्यचकित करणारी आकडेवारी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com