Virat Kohli : विराट कोहलीनं मोडला महान सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड; आश्चर्यचकित करणारी आकडेवारी

Virat Kohli Breaks Sachin Tendulkar World Record : रिटायरमेंटची चर्चा सुरू असतानाच विराट कोहलीनं सिडनी वनडेत ऐतिहासिक खेळी केली. त्यानं नाबाद ७४ धावा कुटल्या. या खेळीसह कोहलीनं महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडला.
Sachin Tendulkar Rohit Sharma and virat Kohli
Sachin Tendulkar Rohit Sharma and virat Kohlisaam tv
Published On
Summary
  • विराट कोहलीची सिडनी वनडेत तळपली बॅट

  • ऑस्ट्रेलियाविरुद्ध चोपल्या नाबाद ७४ धावा

  • महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा विराट विक्रम मोडला

ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील सुरुवातीच्या दोन सामन्यांत शून्यावर बाद झाल्यानंतर तिसऱ्या वनडेत विराट कोहलीला सूर गवसला. सिडनीत झालेल्या अंतिम सामन्यात विराटची बॅट तळपली. सिडनीच्या मैदानावर कोहलीनं ७४ धावांची नाबाद खेळी केली. रोहित आणि विराट यांच्या जोडीनं तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला ९ विकेट्स राखून पराभूत केलं. कोहलीनं रोहितच्या सोबतीनं दुसऱ्या विकेटसाठी १६८ धावांची मॅच विनिंग भागीदारी रचली. चेजमास्टर विराट कोहलीनं या इनिंगच्या जोरावर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडला.

सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या नावावर आजही अनेक विश्वविक्रम आहेत. त्यातील एक विक्रम विराट कोहलीनं सिडनीत ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध खेळताना मोडला. तिसऱ्या वनडेत कोहलीनं ७४ धावा केल्या. तो नाबाद राहिला. कोहली आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्यानं विक्रमादित्य सचिन तेंडुलकरला मागे टाकलंय. सचिनने वनडे आणि टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण १८४३६ धावा केल्या. तर कोहलीने त्याला मागे टाकत १८४४३ धावा केल्या आहेत.

संगकाराला कोहलीनं टाकलं मागे

विराट कोहलीनं फक्त सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला नाही तर, वनडेमध्ये आता तो सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. आता या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानी कायम असून, कोहली १४२५५ धावांसह दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. श्रीलंकेचा फलंदाज-विकेटकीपर कुमार संगकाराला त्यानं मागे टाकलं आहे. संगकारानं वनडेमध्ये १४२३४ धावा केल्या आहेत.

Sachin Tendulkar Rohit Sharma and virat Kohli
Rohit Sharma-Virat Kohli : रोहित शर्मा, विराट कोहली २०२७ चा वर्ल्डकप खेळणार का? अजित आगरकर पहिल्यांदाच इतका स्पष्ट बोलला

याशिवाय वनडेमध्ये आव्हानाचा पाठलाग करताना सर्वाधिक ५० हून अधिक धावांची खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही विराट अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्यानं सचिनचा हा विक्रमही मोडला आहे. विराटने धावांचा पाठलाग करताना ७० वेळा अशी बहारदार खेळी केली आहे. तर सचिन तेंडुलकरनं धावांचा पाठलाग करताना ६९ वेळा फिफ्टी प्लस धावांची खेळी केली होती.

Sachin Tendulkar Rohit Sharma and virat Kohli
Rohit Sharma Record : रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियात रचला इतिहास; विराट, सचिन तेंडुलकरही मागे पडले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com